Valentine's Day 2019: आज म्हणजेच १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रेमाचा दिवस म्हणून या दिवसाला मान्यता आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. हृदयात असलेली भावना या दिवशी व्यक्त केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी ग्रहांचा वेगवेगळ्या राशीवर परिणाम पाहायला मिळतो. आजचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी अधिक चांगला आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना प्रेम व्यक्त केल्य़ानंतर त्यात यश मिळेल हे ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घेऊया.


12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - आज तुमचा दिवश शानदार असणार आहे. लव्ह पार्टनरला तुम्ही सुंदर भेटवस्तू देऊन तुमचं प्रेम व्यक्त करु शकतात. लाल गुलाब देऊन तुम्ही तुमच्या पार्टनरला इंप्रेस करु शकतात.


वृषभ - तुम्ही आज कामात व्यस्त राहू शकता. तुमच्या पार्टनरसाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. एखाद्या सुंदर ठिकाणी तुमच्या पार्टनरला फिरायला घेऊन जा. तुमच्या पार्टनरला तुम्ही पांढरं फूल द्या.


मिथुन - तुमच्या लव्ह लाईफला आज सुंदर दिशा मिळेल. प्रेमाच्या गोष्टींमध्ये आज तुमचा संपूर्ण दिवस जाईल. या दिवशी पार्टनरला घेऊन हॉटेलमध्ये नक्की जा.


कर्क - या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लव्ह डे असणार आहे. सुंदर ठिकाणी तुमच्या पार्टनरला घेऊन जा आणि तेथे तुमच्या भावना बोलून दाखवा. तुमच्या पार्टनरला आज पांढरं फूल द्या.


सिंह - तुमच्या लव्ह पार्टनरला आज लाल फूल देऊन प्रेम व्यक्त करा. आजच्या दिवस या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. पण कामामुळे थोडा मानसिक ताण असेल.


कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींना आज सुंदर अशी भेटवस्तू मिळणार आहे. कामातून वेळ काढून तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा कराल. लव्ह पार्टनरसोबत बाहेर फिरण्यासाठी जा.


तुळा - लव्हस्टोरीमध्ये नाराज होणं आणि मनवणं असतंच. त्यामुळे तुमच्या पार्टनरला आज सुंदर रंगेबिरंगी फूल देऊन खूश करा. 


वृश्चिक - ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून कोणाला तरी लाईक करत असतील पण मनातली भावना बोलून दाखवली नसेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. लाल गुलाब देऊन तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.


धनु - शनीच्या प्रभावामुळे आज पार्टनरला भेटण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. पण कामातून वेळ काढून तुमच्या पार्टनरला वेळ द्या आणि फिरायला जा.


मकर - मानसिक ताण आणि कामामुळे आजचा दिवस व्यस्त असू शकतो. पण तुमच्या पार्टनरला नक्की भेटा. पार्टनरच्या भेटीमुळे तुमचा तणाव निघून जाईल.


कुंभ - रंगीबिरंगी फूलांचा गुलदस्त देऊन तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करु शकता. तुमच्यासाठी आजचा दिवस सुंदर असणार आहे. पार्टनरला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा. 


मीन - या राशीच्या व्यक्तींनी आपल्या पार्टनरला किंवा तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला पिवळं फूल देऊन इंम्प्रेस करा. तुमच्या पार्टनरला सुंदर ठिकाणी फिरायला घेऊन जा.