मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते की, ते सकाळी उठल्यावर पहिलं आपलं ज्योतिषशास्त्र किंवा राशीभविष्य पाहातात. ज्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी कसा असेल, यासाठी त्यांना काय करावं लागेल आणि काय करु नये याबद्दल माहिती मिळते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या काळाबद्दल आणि अगदी दिवस आणि रात्रीबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या अंतर्गत कोणते काम करण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे आणि कोणती नाही, हेही सविस्तर सांगितले जाते. त्याचप्रमाणे यामध्ये असे देखील सांगण्यात येते की, सूर्यास्ताच्या वेळी काय काम करावं आणि काय काम करु नये. ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. सूर्यास्ताच्या वेळी महत्वाची काम केल्यामुळे जीवनात धनहानी, रोगराई यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशी कामं करणं थांबवावं.


नकारात्मक शक्ती सक्रिय राहतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी आणि त्यानंतर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होतात, त्यामुळे या काळात काहीही करू नये. तसेच यावेळी देवतांची पूजा करावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा प्रभावित होत नाही.


आता संध्याकाळच्या वेळी काय काम करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊया.


- संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा कधीही बंद ठेवू नका. असे मानले जाते की, यावेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. अशा वेळी दार बंद ठेवल्याने ती कधीही येत नाही, ज्यामुळे घरात गरिबी येते.


- संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावणे खूप शुभ मानले जाते, परंतु यावेळी चुकूनही तुळशीच्या झाडाला हात लावू नका. संध्याकाळी तुळशीला स्पर्श केल्यावर तिला राग येतो.


- संध्याकाळच्या वेळी लसूण-कांदा, मीठ, आंबट वस्तू आणि सुई कोणालाही देऊ नये, तसेच या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नयेत. गरज पडल्यास या वस्तू बाजारातून विकत घ्या किंवा गरजूंना त्या विकत घेण्यासाठी पैसे द्या.


- संध्याकाळी पैसे मागणाऱ्या किंवा गरिब लोकांना रिकाम्या हाताने परत जाऊ नका. आपल्या क्षमतेनुसार त्यांना काहीतरी दान करा.


- संध्याकाळी पैशाचे व्यवहार करू नका. कोणाला उधार देऊ नका आणि घेऊ नका. यावेळी उधार दिलेली रक्कम परत केली जात नाही, असे मानले जाते.


- संध्याकाळी घरात कधीही झोपू नका किंवा भांडण करू नका. संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते आणि यावेळी भांडण झाल्यामुळे लक्ष्मीचे आगमन होण्याऐवजी तिची बहीण अलक्ष्मीचे आगमन होते, ज्यामुळे घरात दारिद्र्य येते. अशा परिस्थितीमुळे आर्थिक तुमचे नुकसान होऊ शकते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)