Vastu Tips For Placing House Keys: (Vastu Rules) वास्तूच्या नियमांनुसार अशा अनेक गोष्टी आहेत, असे अनेक वारकावे आहेत ज्याकडे आपण प्रकर्षानं लक्ष देतो. पण, काही मात्र आपल्या नजरेतून सुटकात. थोडक्यात दुर्लक्षित राहतात. आपण ज्या वास्तूमध्ये राहता, जिथं वावरतो त्या ठिकाणी कायमच सकारात्मता नांदत ठेवणं आवश्यक असतं. ही सकारात्मकता त्या वास्तूमध्ये असणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या वस्तूमध्ये दडलेली असते. अगदी घरामध्ये असणाऱ्या लहानशा चावीमध्ये/ किल्लीमध्येसुद्धा. (right way to put keys)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या घरात एक ना अनेक चाव्या असतात. घराची, बाईकची, कारची, कपाटाची, लहानशा खणाची किंवा मग आणखी कसलीतरी चावी घरात असतेच असते. वास्तूशास्त्रामध्ये याच चाव्या ठेवण्याच्या योग्य नियमाबद्ल माहिती देण्यात आली आहे. सहसा लोक चाव्या घरात कुठंही ठेवतात. अगदी कुठंही. पण, तुम्हाला माहितीये का तुम्ही चावी कुठं ठेवता याच्यावरून घरातील सकारत्मक आणि नकारात्मक शक्तींचा वावर ठरतो. 


चाव्यांविषयीचे हे नियम एकदा वाचाच... (Rules to put keys at a right place)


- वास्तू शास्त्रात (Vastu shastra rules for keys) नमूद केलेल्या नियमांनुसार चावी कधीच लिविंग रुममध्ये ठेवू नका. असं केल्यास येणाऱ्याजाणाऱ्यांची नजर चाव्यांवर पडते. वास्तू नियमांनुसार हे योग्य नाही. 


- चाव्या देवखोलीमध्येही ठेवू नका. चाव्या सहसा अस्वच्छ असतात. त्यामुळं पूजास्थळापासून त्या दूर ठेवाव्यात अन्यथा तिथं नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो. 


- घरातील स्वयंपाकाच्या (Kitchen) खोलीमध्येतर चावी अजिबातच ठेवू नका. इथं स्वच्छतेची काळजी घ्या. 


हेसुद्धा वाचा : Tuesday Upay : घरातील आर्थिक संकटामुळे हैराण आहात? मग मंगळवारच्या दिवशी करा 'हे' उपाय, होईल पैशांचा पाऊस


- वास्तू नियमांनुसार चावी घराच्या प्रवेशाकडे असणाऱ्या भागात पश्चिम दिशेला ठेवावी. एखाद्या खोलीमध्ये चाव्यांचं स्टँड उत्तर किंवा पूर्व दिशेला असणाऱ्या कोपऱ्यामध्ये असेल तर, हे शुभ आहे. 


- चावी लाकडी स्टँडवर ठेवल्यास ही अतिशय शुभ बाब ठरते. ज्या चाव्यांचा घरात काहीच वापर नाही त्या ताबडतोब घराबाहेर काढा. असं न केल्यास आर्थिक चणचण भासू लागेल. सोबतच गंज चढलेलं टाळं किंवा चावीसुद्धा घरात ठेवलू नका. असं केल्यानं घरात नकारात्मक शक्कींना वाव मिळतो. 


(वरील माहिती सर्वसामान्य मान्यता आणि संदर्भांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)