Mangalwar ke Totke : आज मंगळवार...हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कुठला ना कुठल्या देवाला समर्पित केला गेला आहे. मंगळवार हा गणपतीचा वार असतो हे अनेकांना माहिती आहे. याशिवाय मंगळवार हा हनुमानाचाही वार आहे. मंगळवारच्या दिवशी बजरंग बलीची उपास केल्यास तुमच्या अनेक समस्या नाहीशा होती, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हनुमानाला हनुमानाला अडथळे दूर करणारे आणि सर्व संकटांचे रक्षणकर्ता म्हटलं जातं. म्हणून जर मंगळवारशी संबंधित 5 चमत्कारी उपाय केल्या तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची चणचण जाणवणार नाही.
मंगळवारीचे उपाय (Mangalwar ke Totke)
मंगळवारच्या दिवशी गरीबांना अन्नदान करा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा त्यांना पैशाची मदत करु नका. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणी खूप माकड आहेत, अशा ठिकाणी जाऊन माकडांना हरभरा, गूळ, केळी किंवा शेंगदाणे खायला द्या. हे दोन्ही उपाय सूर्य मावळण्याच्या पहिले केले पाहिजे. या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात. (Tuesday or Mangalwar ke Upay bajrang bali for money shani gochar 2023 and Horoscope 17 January 2023 marathi news)
जर तुमच्या कुंडलीवर शनीची वाईट नजर जात असेल तर मंगळवारी 108 तुळशीच्या पानांवर पिवळ्या चंदनाने रामाचं नाव लिहा. यानंतर त्या पानांची हार हनुमानजींना घालून त्यांची पूजा करा. असं केल्याने मंगळ, शनि आणि राहूशी संबंधित सर्व दोष लगेच दूर होतात. हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही.
मंगळवारीच्या दिवशी हनुमान मंदिरात जा. तिथे बजरंग बलीला सिंदूर लावा आणि गुलाबाच्या फुलांचा हार घाला. यानंतर सुंदरकांड पठण करावं. असं म्हणतात की, हा उपाय सतत 11 मंगळवार केल्याने सर्व संकट टळतात. ज्योतिषशास्त्रात अकाली मृत्यूचं संकटही टाळण्याचा हा एक उत्तम मार्ग मानला जातो.
ज्योतिषांच्या मते, तुम्ही मंगळवारी तसंच शनिवारी हनुमान मंदिरात जावे. तेथे बसून 108 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. यानंतर, तुमचं संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा. असं म्हणतात की, भगवान हनुमान कधीही आपल्या भक्तांच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत नाहीत आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)