Vastu Tips about kitchen : वास्तूशास्त्रानूसार घरातील प्रत्येक गोष्टीला आणि जागेला महत्त्व असतं. घर सजवता प्रत्येक जण वास्तूशास्त्रानुसार (vastu tips ) इंटेरिअर करतो. एवढंच नाही तर, कोणती वस्तू  कोणत्या ठिकाणी ठेवायला हवी या गोष्टींची माहिती आणि महत्त्व देखील वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आली आहे. स्वयंपाक घरात देखील एक असं ठिकाण आहे ज्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाचं चक्र सुरू असतं. पण अशा काही गोष्टी अशा ज्या स्वयंपाक घरात ठेवू नये. (vastu for kitchen)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरातील वास्तूमध्ये केलेल्या चुकीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात काही वस्तू स्वयंपाकघरात ठेवण्यास सक्त मनाई आहे.


- अनेकदा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरलं जातं. वास्तुशास्त्रात याला खूप अशुभ सांगितलं जातं. मळलेले पीठ रात्रभर ठेवल्याने घरात शनि आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. (vaastu tips for kitchen)


- अनेक लोक औषधे, बँडेज किंवा ट्यूब इत्यादी स्वयंपाकघरात ठेवतात, जेणेकरून भाजल्यास आणि कापल्यास त्वरित जखमेवर लावता येईल. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फर्स्‍ट एड किट घरात असणं महत्त्वाचं आहे, परंतु ते स्वयंपाकघरात ठेवण्याची चूक करू नका. वास्तूनुसार स्वयंपाकघरात औषधं ठेवल्याने घरातील प्रमुख व्यक्ती आजारी राहतो. (vastu video for kitchen)


- तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी कधीही वापरू नका किंवा स्वयंपाकघरात ठेवू नका. असं करणं म्हणजे विनाशालाच आमंत्रण देणं आहे. तुटलेल्या भांड्यांमुळे आर्थिक संकट निर्माण होतं. (kitchen direction as per vastu)


- स्वयंपाक घरात कधीही मंदिर ठेवू नका. कारण स्वयंपाक घरात सात्विक आणि तामसिक या दोन्ही प्रकारचं भोजन शिजतं. (kitchen vastu directions)


- स्वयंपाक घारात कधीही चप्पल घालू नका. कारण स्वयंपाक घरात अन्नपूर्णाचा निवास असतो. जर तुम्ही स्वयंपाक घरात चप्पल घालत असाल तर तो अन्नपूर्णा देवीचा अपमान मानला जातो.