Vastu Shastra: आपल्यापैकी अनेकांना उन्हाळ्यापेक्षा थंडी (Winter) म्हणजेच हिवाळ्याचे दिवस आवडतात. ऋतु बदलला की बरेच जणं त्यांची लाईफस्टाईल देखील बदलते. बाहेरील वातावरण तुमच्या जीवनात बदल घडवून आणतं म्हणून वास्तुशास्त्रात देखील याचं विशेष महत्त्व सांगण्यात आलंय आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तू शास्त्रानुसार, हिवाळ्यात घराच्या ठेवणीबाबत काही खास गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या ऋतूमध्ये वास्तुशी संबंधित काही चुका तुम्हाला मोठ्या प्रमाणात महागात पडू शकतात.


खिडक्यांना असणारे मोठे पडदे


वास्तु शास्त्रानुसार, ऊन हे सकारात्मकतेचं प्रतिक मानलं जातं. असं म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पोहोचतात, त्या ठिकाणी नाकारात्मक उर्जा पोहोचत नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर मोठे पडदे लावू नका.


पिवळ्या रंगाचे लाईट्स


थंडीच्या दिवसांत तुमच्या घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या लाईट्सऐवजी पिवळ्या रंगाच्या लाईट्सचा वापर करा. पिवळा हा वॉर्म रंग मानला जातो. पिवळा रंग थंडीमध्ये त्याच्या रंगाने सकारात्मकता पसरवण्याचं काम करतो. त्यामुळे घरातील कोपऱ्यांमध्ये याचा अधिक वापर करावा.


हीटरचा वापर


थंडीचा त्रास होऊ नये यासाठी अनेकजण हीटरचा वापर करतात. जर तुम्ही थंडीपासून वाचण्यासाठी हीटर वापर असाल तर ध्यानात ठेवा की, north-west corner मध्ये वापर करावा.


लाल रंगाची मेणबत्ती


नोकरी, बिझनेस आणि पर्सनल लाईफ यांमध्ये अडचणींमुशे अनेकदा लोकं चिंतेत असतात. तुम्हालाही अशाच त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर हिवाळ्यात नऊ लाल रंगाच्या मेणबत्त्या दक्षिण दिशेला लावा. दक्षिण दिशेला असलेल्या या लाल रंगाच्या मेणबत्त्या तुमच्या घरातून नकारात्मकता दूर ठेवण्यास मदत करतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)