Vastu Tips : `या` दिशेला तोंड करून कधीही खाऊ नका अन्न
घराची वास्तू जर चांगली किंवा बरोबर असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, सौभाग्य, संपत्ती मिळते.
मुंबई : वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. ज्यामुळे बरेच लोक घर नवीन घेताना किंवा बनवताना त्याच घराचा दरवाजा, खिडक्या, देवघर याची दिशा विचारात घेतात. वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला काय असायला हवं आणि काय नको? त्याचे फायदे-तोटे सगळं काही सांगितलं जातं. वास्तुशास्त्राचे महत्त्व ज्यांना माहीत आहे, त्यांना हे देखील चांगलेच माहीत आहे की, प्रत्येक गोष्ट वास्तूनुसार करणे किती आवश्यक आहे.
घराची वास्तू जर चांगली किंवा बरोबर असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, सौभाग्य, संपत्ती मिळते, तर वास्तूच्या विरुद्ध काही केले तर ते अशुभ असते आणि लाभाऐवजी त्याचा तोटा सुरू होतो. याचा अनुभव अनेकांनी घेतला देखील असेल.
परंतु तुम्हाला माहितीय काय? की नुसत्या वस्तुच नाहीतर आपल्या खाण्याची आणि झोपण्याची दिशाही वास्तुमध्ये सांगितली आहे. ज्याचे पालन केल्यामुळे आपल्याला फायदाच होतो.
वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेने झोपल्यास किंवा चुकीच्या दिशेने तोंड करून अन्न खाल्ल्यास खूप नुकसान होते. त्यामुळे वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खावे आणि कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खाऊ नये असे सांगितले आहे, ते जाणून घेऊया.
पूर्व दिशा
पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास तुमचे सर्व रोग दूर होतात. ही देवांची दिशा आहे, त्यामुळे या बाजूला तोंड करून अन्न खाल्ल्याने वय वाढते आणि रोग दूर होतात.
पश्चिम दिशा
वास्तुशास्त्रानुसार नोकरी करणाऱ्या लोकांनी पश्चिमेकडे तोंड करून अन्न खावे. घरातील कोणताही सदस्य आजारी असल्यास त्यानेही पश्चिमेकडे तोंड करून अन्न खावे, यामुळे आरोग्य सुधारते.
उत्तर दिशा
उत्तर दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्यास घरात धनाचा वर्षाव होतो. घरातील प्रमुखाने नेहमी उत्तरेकडे तोंड करून अन्न खावे.
दक्षिण दिशा
वास्तूनुसार दक्षिणेकडे तोंड करून अन्न कधीही खाऊ नये. त्यामुळे गरिबी येते आणि पैसा जातो. ही दिशा पितरांची दिशा आहे, त्यामुळे या बाजूला तोंड करून अन्न खाऊ नका आणि या बाजूला तोंड करून अन्न शिजवू देखील नका.
वास्तुशास्त्रानुसार जेवताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
- वास्तुशास्त्रानुसार जेवणाचे टेबल दक्षिण किंवा पश्चिम भिंतीकडे ठेवा.
- अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नका.
- जर घरात पाहुणे आले असतील, तर त्यांना दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बसवून खाऊ घाला आणि आपलं स्वत:चं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)