Vastu Shastra Horse Statue : घरात कोणतीही वस्तू ठेवताना सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी ठेवायची त्याच ठिकाणी ठेवली तर सुख-शांती घरात राहते. इतकंच नाही तर आयुष्यात आणि करिअरमध्ये देखील आपण पुढे जातो. जर घरातील वास्तूच योग्य नसेल तर कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घरातील वास्तू योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्यापैकी एक म्हणजे घोड्याची मूर्ती घरात कुठे ठेवायची. त्याची योग्य दिशा कोणती आहे, जेणे करून तुमच्या आरोग्यावर आणि करिअरवर चांगला परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया त्याविषयी काय सांगितलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराच्या उत्तर दिशेला घोड्याची मूर्ती ठेवणं शूभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की या दिशेला घोड्याची मूर्ती ठेवल्यानं जीवनात सकारात्मकता वाढते. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहतं. त्याशिवाय जर कोणत्या व्यक्तीच्या व्यवसायात अडथळे निर्माण होत असतील तर त्यापासून देखील सुटका मिळते. अर्थात ऑफिस, दुकानच्या देखील उत्तर दिशेला घोड्याची मूर्ती ठेवा. मान सन्मान वाढतो आणि जीवनात सुरु असलेल्या समस्यांपासून सुटका मिळते. 


घोडा हा स्पीड, शक्ती आणि यशाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. घरात घोड्याची मूर्ति ठेवल्यानं सकारात्मक उर्जा राहते आणि नकारात्मकता दूर होते. घोड्याची मूर्ती ही धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्याला उत्तर दिशेला ठेवल्यास धनलाभ होण्याची शक्यता वाढते. घोड्याची मूर्ती ही धावणारी असायला हवी. घरात घोड्याची मूर्ती ठेवल्यानं मानसिक शांती देखील मिळू शकते. या दिशेला मूर्ती ठेवल्यानं तुम्ही अनेक आर्थिक संकटांपासून दूर रहाल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)