मुंबई : घरातील प्रत्येक खोलीची फक्त दिशा योग्यच असणं गरजेचं नाही. तर वास्तुशास्त्रानुसार, घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत सतर्क राहणं गरजेचं असतं. यामुळे घरातील सुख शांती कमी होते. आपत्तीजनक घटना घडतात. 


घरात चुकूनही करू नका या गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरामध्ये काटेरी झाडे कधीही ठेवू नका. कॅक्टससारखी काटेरी झाडे घरात नकारात्मकता आणतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावते. त्याच वेळी, बोन्साय वनस्पती वाढीस अडथळा आणते. घरात या वनस्पतींच्या उपस्थितीमुळे अनेक वास्तुदोष निर्माण होतात.


घराच्या भिंतींवर वन्य प्राण्यांची चित्रे, युद्धाची चित्रे, उजाड निसर्गचित्रे, सुकलेल्या झाडांची चित्रे लावण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने अनेक समस्या, तणाव येतो. घरामध्ये नेहमी आनंदी, रंगीबेरंगी आणि मन प्रसन्न करणारी चित्रे ठेवा.


घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे फारच अशुभ असते. या आळशीपणामुळे घरातील लोकांमध्ये चिडचिडेपणा येतो. ते गोंधळातच राहतात. त्यांची प्रगती खुंटते. योग्य निर्णय घेऊ शकत नाही. एकूणच, घरात जाळे असणे हे परस्पर संबंध आणि नोकरी-व्यवसाय या दोन्हीसाठी चांगले नाही.


घरात नटराजाची मूर्ती ठेवणे देखील चांगले नाही. हे शिवाच्या नंगा नाचाचे चित्र आहे, ज्यांच्या घरात राहिल्याने नातेसंबंधांवर आणि परस्पर प्रेमावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नटराजाची मूर्ती कधीही घरात ठेवू नका.