Dustbin Place as per Vastu : असं म्हणतात, की वास्तू कायम तथास्तू म्हणत असते. हे तेव्हाच होतं जेव्हा वास्तूची आपणही त्या वास्तूची काळजी घेतो. काही गोष्टी वास्तूमध्ये अपेक्षित दिशेलाच असणं गरजेचं ठरतं. तेव्हाच घरात सतत सकारात्मकता आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाईगडबडीत एखादी गोष्ट इकडची तिकडे झाल्यास मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. केराचा डबा त्यापैकीच एक. केराचा डबा योग्य स्थानी न ठेवल्यास त्यामुळे कुटुंब प्रमुखाला त्रास जाणवू शकतो. 


कचऱ्याचा डबा ठेवण्याची योग्य दिशा कोणती? 
- वास्तू शास्त्राच्या नियमानुसार घरात कचऱ्याचा किंवा केराचा डबा कधीच उत्तर- पूर्व दिशेला ठेवू नका. असं केल्यास कुटुंबातील माणसांना मानसिक ताण सतावू शकतो. सोबतच देवी लक्ष्मीची नाराजीसुद्धा ओढवली जाऊ शकते. कारण या दिशेला देवतांचा वास असतो. 


- घराच्या दक्षिण- पूर्वेला केराचा डबा ठेवल्यास साठवलेलं धन संपुष्टात येतं. यामुळं पैसा घरात टिकत नाही. अनेकदा तर, व्यक्ती कर्जबाजारीसुद्धा होतात. 


- घराच्या पूर्व दिशेला केराचा डबा ठेवण्याचा कधीच प्रयत्न करु नका. असं केल्यास घरातल्या माणसांची प्रगती थांबते. 


- केराचा डबा ठेवण्याची सर्वात योग्य दिशा आहे, दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम. शिवाय उत्तर- पश्चिम दिशेलाही केराचा डबा ठेवता येऊ शकतो. असं केल्यास घरात सुख- समृद्धी नांदेल. 


केराबद्दल एक काळजी नक्की घ्या, की तुम्ही नियमीत घरातला केर स्वच्छ कराल. घरात कचरा साठवून ठेवू नका. हा डबा झाकून ठेवा अन्यथा घरात नकारात्मक उर्जेचा वावर वाढतो.