Vastu Tips for Brass Lion Statue : घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्त्व वास्तुशास्त्रात (Vastu Tips) सांगण्यात आले आहे आणि कोणतीही गोष्ट योग्य ठिकाणी न ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, लोक अनेकदा आपल्या घरात पितळाचा सिंह ठेवतात, (Lion Statue) ज्याचा जीवनावर चांगला प्रभाव पडतो आणि आत्मविश्वास वाढतो. दरम्यान, पितळाचा सिंह योग्य दिशेने ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि तसं न केल्यास लाभाऐवजी तुमचं नुकसान होऊ शकते. चला तर जाणून घेऊया पितळाचा सिंह कोणत्या दिशेला ठेवायला हवा आणि कोणत्या दिशेला ठेवू नये. 


पितळाचा सिंह घरात ठेवल्याने फायदा होतो (Brass Lion Statue Benifits)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) पितळाच्या सिंहाची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळे घरातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो. यासोबतच घरातील लोकांना कधीही पराभवाचा सामना करावा लागत नाही आणि व्यवसायासोबतच करिअरमध्येही प्रगती होते. घरात पितळाचा सिंह ठेवल्यानं घरातील लोकांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना कोणत्याही मोठ्या गोष्टीला यशस्वीरित्या टॅकल करतात. 


गुरु पितळाच्या सिंहामध्ये राहतो 


घरात पितळाचा सिंह ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु कमकुवत आहे त्यांनी घरात पितळाची सिंहाची मूर्ती ठेवायला हवी. यामुळे कुंडलीतील दोष दूर होतात.


घरात पितळाचा सिंह कोणत्या दिशेला ठेवावा 


वास्तुशास्त्रानुसार, लाभासाठी पितळाचा सिंह योग्य दिशेला ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पितळाचा सिंह उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवावा. यासोबतच पितळाचा सिंहाचा चेहरा घराच्या मध्यभागी असावा. याशिवाय पितळाच्या सिंहावर धूळ असू नये, कारण त्याचा अशुभ प्रभाव असतो.


पितळाचा सिंह चुकीचा दिशेनं ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात


घरात पितळाचा सिंह ठेवल्यानं आत्मविश्वास वाढतो तसेच आर्थिक प्रगतीही होते, परंतु वास्तुशास्त्रानुसार तो योग्य प्रकारे ठेवला नाही तर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी पितळाचा सिंह योग्य पद्धतीने आणि घरात योग्य ठिकाणी ठेवायला हवी. त्यासाठी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)