Vastu Tips : घर असो वा ऑफिस असे अनेक जण असतात ते बिनधास्त दुसऱ्यांचा वस्तू वापरतात. यापैकी अनेक जण आपली वस्तू (things) जपून ठेवतात आणि इतरांच्या वस्तूचा वापर करतात. अनेकांना आपल्या वस्तू दुसऱ्यांनी वापरलेल्या आवडतं नाही. पण तरीदेखील नाही म्हणता येतं नाही. पण जर तुम्ही असं करत असाल तर आपल्या वस्तू इतरांना देऊ नये आणि तुम्ही जर दुसऱ्यांचा वस्तू जास्त वापरत असाल तर लगेचच ही सवय बंद करा. ती वस्तू विकत घेण्यापेक्षा दुसऱ्यांची वापरू आणि पैसे (money Tips) वाचवू असा तुमचा उद्देश असेल तर तो चुकीचा आहे. कारण वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) असं करणे म्हणजे तुम्ही संकटांना आमंत्रण देत आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या ना कोणाला द्याव्यात किंवा कोणाच्या वापराव्यात. (Vastu Tips Do you frequently use other peoples 7 things Then if you dont stop now financial crisis will come in your life) 


लिपस्टिक (lipstick)


लिपस्टिक ही अशी गोष्ट आहे, जी आपण इतरांकडून घेऊ नये. त्यामुळे मुलींनी दुसऱ्याची लिपस्टिक मागू नये आणि कोणी मागितली तरी देखील ती देऊ नये.


दुसऱ्याचे कपडे (clothes)


आपण कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या आत प्रवेश करते आणि जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागतात. त्याच प्रमाणे जर कधी दुसऱ्याने आपले कपडे वापरले, तर आपण ते कपडे पुन्हा घालू नये. असं केल्याने आपल्यामध्ये देखील दुसऱ्या व्यक्तीची निगेटीव्ह शक्ती येऊ शकते.


पेन (Pen)


बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे पेन नसलं की, आपण दुसऱ्यांकडून त्यांचा पेन घेतो. परंतु हे लक्षात ठेवा की, इतर वेळी हे ठिक आहे, परंतु महत्त्वाच्या कराराच्या वेळी किंवा कामाच्या वेळी आपला स्वतंत्र पेन वापरावा.


वास्तविक, वास्तुशास्त्रानुसार, आपण कधीही दुस-याची लेखणी आपल्याजवळ ठेवू नये. हे केवळ करिअरच्या दृष्टीने शुभ मानलं जात नाही, तर यामुळे तुमचे पैसेही बुडू शकतात.


 


हेसुद्धा वाचा - Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं


 


अंगठी (ring)


वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालने देखील अशुभ आहे. असं केल्यानं माणसाचे आरोग्य, जीवन आणि आर्थिक आघाडीवर वाईट परिणाम होतो.


घड्याळ (clock)


वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशीही आहे. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे, फार अशुभ मानलं जातं. असं केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो असं म्हणतात.


रुमाल (Handkerchief)


वास्तुशास्त्रानुसार, रुमाल दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ ठेवल्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्याला लोकांमधील मारामारी आणि भांडणांशी जोडून पाहिले जाते. त्यामुळे दुस-याचा रुमाल कधीही आपल्या सोबत ठेवू नये.


चप्पल (slippers)


शास्त्रानुसार दुसऱ्यांची चप्पल वापरल्यास तुमच्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं.


दुसऱ्याचं अंथरूण वापरू नये


कधीच दुसऱ्या अंथरूणावर झोपू नये. अनेकदा आपल्याला सवय असते की दुसऱ्याच्या अंथरूणावर आपण झोपून जातो. मात्र यामुळे मानसिक त्रास उद्भवतो तसंच आर्थिक समस्याही जाणवू शकते.