मुंबई : मेहनत तसंच कष्ट करूनही अनेक व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. यामागचं कारण आहे की, त्यांच्याकडून नकळत छोट्या-छोट्या चुका होत असतात. या चुकांची त्यांना जाणीव नसते. मात्र याचा परिणाम असा होतो की, घरातील सुख-समृद्धी हिरावून घेतली जाते. वास्तूनुसार, जर आपण रोजच्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि घरात ठेवलेल्या काही गोष्टी काढल्या तर त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. 


या गोष्टी घरात नकोच-नको


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    तुमच्याकडे जर फाटलेले कपडे असतील तर ते आजच काढून टाका. कारण ते शुक्र ग्रहाचा नाश करू शकतात. यामुळे जीवनात आर्थिक संकट सुरू होऊ शकतं.

  • तुमच्या घरातील देवाऱ्याच दर फाटलेले आणि जुने देवाचे फोटो तसंच तुटलेल्या मूर्ती  ठेवू नका. यामुळेही आर्थिक नुकसान होते.

  • घरामध्ये महाभारत युद्धाचा फोटो, ताजमहालचं चित्र, बुडणारी बोट, जंगली प्राण्यांचे चित्र, कबरी, काटेरी झाडांची चित्रं ठेवू नये. यामुळे नकारात्मक भावना वाढतात. ज्यामुळे जीवनात चांगल्या घटना घडणं थांबतं.

  • घरात किंवा खिडकीमध्ये जर कबुतराचं घरटं असेल तर ते काढून टाकावं. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटते. 

  • बंद घड्याळ कधीही घरामध्ये ठेवू नये. घरातील घड्याळ बंद असेल किंवा खराब झालं असेल तर ते घरात ठेवू नका. असाने कामात अनेक अडथळे निर्माण होतात.

  • जर घरात प्लास्टिकच्या वस्तू असतील तर त्या काढून टाका. कारण प्लास्टिकच्या अतिरेकाने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

  • घरात जुनी वर्तमानपत्रं ठेवली असतील किंवा रद्दी असेल तर ती लगेच काढून टाका. यावर साचणारी धूळ आणि मातीचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

  • घरातील कुलूपाकडेही दुर्लक्ष करू नका. जर खराब कुलूप असेल ताबडतोब काढून टाका. कारण खराब कुलुपाचा माणसाच्या प्रगतीवर परिणाम होतो.


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)