तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नका `या` गोष्टी; नुकसान एकदा जाणूनच घ्या
वाईट परिणाम घरावर आणि ओघाओघानं घरातल्या माणसांवर दिसून येतात.
Vastu Tips : सहसा घरात अनेक अशा वस्तू किंवा अशी रोपं लावली जातात जी वास्तूच्या दृष्टीनं अतिशय पूरक समजली जातात. पण, बऱ्याचदा अनावधानानं या रोपांच्या आजुबाजूला आपल्याकडून अशा काही गोष्टी ठेवल्या जातात, ज्यामुळं त्याचे वाईट परिणाम घरावर आणि ओघाओघानं घरातल्या माणसांवर दिसून येतात.
घराघरामघ्ये (House) वास्तूच्या भरभराटीसाठी ठेवण्यात येणाऱ्य़ा वस्तू, रोपांपैकी एक म्हणजे तुळस. अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाला हिंदू संस्कृतीत (Hindu religion) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. अनेकजण त्याची मनोभावे पूजा करतात. पण, त्यासोबतच या रोपाची काळजीही घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी, की चुकूनही तुळशीच्या बाजूला काही ठराविक गोष्टी ठेवू नयेत.
काटेरी झुडुपं-
तुळशीच्या बाजुला चुकूनही काटेरी झुडुपं ठेवू नका. असं केल्यास घरात नकारात्मक उर्जा संचारते.
चप्पल (Shoe, Sandals)-
तुळशीच्या आजुबाजूला चपला ठेवू नका. असं केल्यास घरात दारिद्र्य ओढावते. शिवाय झाडूसुद्धा तुळशीच्या बाजूला ठेवू नका.
शिवलिंग-
वास्तू नियमांनुसार अनेकजण तुळशीत शिवलिंग ठेवतात. पण, हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं केल्यास आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम दिसून येतात.
गणपतीची मूर्ती-
तुळशीच्या बाजुला गणपतीची (Ganpati) मूर्तीही ठेवू नये. यामुळं नकारात्मकता वाढते.
अधिक वाचा : Diwali 2022: दिवाळीपूर्वी साफसफाईचं असं नियोजन करा; वास्तुशास्त्रानुसार या वस्तू फेकून द्या
तुळस दक्षिण दिशेला अजिबात ठेवू नये, असं केल्यास घरातील सुख- समृद्धी निघून जाते. शिवाय जिथं तुळस आहे ती जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवावी. तुळस घरात असल्यास सुर्यास्तानंतर (Sunset) तिची पानं तोडणं अशुभ मानलं जातं. एकादशी, द्वादशी, संक्रांत, सूर्यग्रहण या दिवशी तुळस तोडू नये. थोडक्यात अतिशय नाजूक आणि पवित्र असणाऱ्या या रोपाची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं.