Diwali 2022: दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा शुभ सण आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी लोकं आपली घरे आणि दुकाने स्वच्छ करून घेतात. अनेक घरांमध्ये वर्षातून एकदाच संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. यासाठी सगळ्यांनाच सहभागी व्हावं लागतं. पण साफसफाई करताना काही जुन्या वस्तू फेकण्याऐवजी सांभाळून ठेवतो. पण त्यापैकी काही वस्तूंध्ये नकारात्मक उर्जा असते. त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवण्याऐवजी फेकून देणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता केल्यास घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते.
साफसफाईचं असं नियोजन करा
-आपल्या घरातील प्रत्येक खोलीचा आकार आणि त्यातील वस्तूंचा अंदाज घ्या. कोणत्या दिवशी कोणती खोली साफ करायची ठरवा. त्यानुसार वस्तूंची आवराआवर करा. व्हॅक्युम क्लिनर, वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे ब्रश, कापड, साबण यांची आधीच तयारी करुन ठेवा.
-साफसफाई करताना लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना दुसऱ्या खोलीत बसवा. धुळीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
-साफसफाई करताना आधी वरच्या बाजूने सुरुवात करा. काचेच्या वस्तू, टीव्ही, मौल्यवान वस्तू झाकून ठेवा. पंखा, जळमटं साफ करून घ्या.
-दारे-खिडक्या पुसताना पाण्यात किंवा कपड्यावर थोडे व्हीनेगर घ्या. काचा आणि दरवाजे स्वच्छ होण्यास मदत होईल.
या वस्तू दुरूस्त करा किंवा फेकून द्या