दारात चपला उलट्या असतील तर घरावर ओढावतील `ही` 4 संकटं
Chappal Darat Ulti Ka Theu Naye: आपल्यापैकी अनेकजण दारामध्ये चप्पल किंवा बूट उलटे दिसले तर लगेच ते सरळ करतो. मात्र दारासमोर चप्पल आणि बूट उलटे ठेऊ नयेत असं का म्हटलं जातं ठाऊक आहे का?
Chappal Darat Ulti Ka Theu Naye: वास्तूशास्त्रानुसार हिंदू धर्मातील मान्यतांप्रमाणे घरात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच घरात कोणतीही वस्तू ठेवता तिची जागा योग्य असावी या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं. वास्तूच्या नियमानुसार घरातील वस्तू कुठे आणि कशा ठेवाव्यात याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तूशास्त्रामध्ये इतर गोष्टींप्रमाणेच बूट आणि चपला कशा ठेवाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शनही करण्यात आलं आहे.
बूट आणि चपला उलट्या ठेऊ नयेत असं का म्हणतात?
बूट आणि चपलांचं स्थान वास्तूच्या नियमांनुसार नसेल तर त्याचाही वास्तूवर आणि वास्तूशी संबंधित व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, घरामध्ये वाटेल त्या ठिकाणी किंवा अगदी दारात बूट आणि चपला उटल्या पडून असतील तर संपत्तीची देवता म्हणजेच लक्ष्मी अशा वास्तूवर प्रसन्न होत नाही. अशा घरांमध्ये आणि तेथील लोकांना कायमच पैशांची चणचण जाणवते. त्यामुळेच घरासमोर बूट आणि चपला उलट्या ठेऊ नयेत किंवा तशा त्या असतील तर सरळ कराव्यात असं सांगितलं जातं. यामागील नेमकी कारणं काय आहेत सविस्तर पाहूयात...
गृहकलहाचं कारण
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये बूट आणि चपला उलट्या असतील तर घरातील लोकांमध्ये होणारे वाद वाढतात. तसेच लक्ष्मी देवीही अशा लोकांवर प्रसन्न होत नाही. लक्ष्मी अशा घरांमध्ये वास करत नाही. त्यामुळे घरावर आर्थिक संकट येऊ शकतं.
विचारांवर नकारात्मक परिणाम
वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार, घराच्या दारातच बूट आणि चपला उलट्या पडलेल्या असतील तर घरात राहणाऱ्या लोकांच्या विचारांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे घरात आजारपण आणि दु:ख येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच घराच्या दारात बूट आणि चपला उलट्या पडल्या असतील तर त्या लगेच सरळ कराव्यात.
शनि देवतेचा प्रकोप
घरात बूट आणि चपला ठेवण्याची जागा योग्य आणि अचूक असणे आवश्यक असतं. घरात बूट आणि चपला उलट्या पडलेल्या असतील तर अशा वास्तूत अनेकदा तणावाची परिस्थिती असते. बूट आणि चपला उलट्या ठेवल्याने शनि देवतेचा प्रकोप होतो. शनिदेवाला पायांची कारक देवता म्हणून ओळखलं जातं.
सकारात्मक ऊर्जा निघून जाते
बूट आणि चपला उलट्या असतील तर घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते असं वास्तूसंदर्भातील तज्ज्ञ सांगतात. उलट्या बूट आणि चपलांमुळे घराकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. म्हणूनच उलट्या बूट आणि चपला घरातील सुख आणि शांतीमध्ये अडथळा ठरतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)