Vastu Tips : रोजच्या तणावानं हैराण? वास्तुमधील `हे` लहानसहान बदल करणार मोठी मदत
ताणतणावापासून दूर होण्यासाठी काही वाटा निवडल्या जातात पण, पालथ्या घड्यावर पाणी.
मुंबई : रोजच्या जगण्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपण इतके व्यग्र असतो, की यामध्ये जगण्याची व्याख्याही आपण विसरून जातो. आपल्यापैकी दर दुसरा माणूस आज तणावाचा सामना करताना दिसत आहे. हे प्रमाण वाढत जाऊन पुढे नैराश्याचीही वाट धरताना दिसत आहे. रोजच्या ताणतणावापासून दूर होण्यासाठी काही वाटा निवडल्या जातात पण, पालथ्या घड्यावर पाणी. (Vastu Tips)
आता मात्र असं होणार नाही. कारण तुमची वास्तूच यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे.
रंगांचा वापर
घरातील रंग आपल्या मानसिक आरोग्यावर बराच परिणाम करतात. वास्तुनुसार तुम्ही रंगांची निवड करत आहात तर तुम्ही कायम तणावविरहित रहाल.
फिकट करडा आणि फिकट गुलाबी असे रंग तणाव कमी करण्याचं काम करतात. यामुळं तुमचं मनं आनंदी आणि तणावमुक्त राहतं. बेडरुमसाठी या रंगांचा वापर फायद्याचा ठरतो.
जांभळा रंगही ताण कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. जांभळ्या रंगाचे कपडे, बेडशीट, पडदे घरात शांतता आणतात.
फिकट निळा रंग तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. तुम्ही फार तणावात असाल तर, काही क्षण फिकट निळा रंग किंवा आकाशात पाहण्याचाही तुम्हाला फायदा होईल.
पांढरा रंग, कायमच सर्व रंगांमध्ये अग्रस्थानी आहे. कारण हा रंग सातत्यानं मानसिक शांतता द्यायचं काम करतो. तर हिरवा रंग तुम्हाला कायम निसर्गाच्या जवळ नेतो.
वास्तु शास्त्रानुसार हा रंग आनंद आणतो आणि यातना कमी करतो. हा एक शुभ रंगही आहे. त्यामुळं बघा वास्तूमध्ये तुम्हाला यापैकी कोणत्या रंगाचा कुठे वापर करता येतोय ते. कारण, फायदा तुम्हालाच आहे.