How To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना `हे` अजिबात करु नका! फळणार नाही पूजा
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Home Temple Vastu Tips : भारतीय संस्कृतीत दिव्याला अन्यन साधारण महत्त्वं आहे. सकाळी देवघरात दिवा लावून पूजा करण्याची परंपरा आहे. तर संध्याकाळी देवघरात, उंबरठ्यावर आणि तुळशीजवळ दिवा लावला जातो. हिंदू धर्मात दिव्याची ज्योत अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे प्रत्येक धार्मिक विधी असो, किंवा कुठलं शुभ कार्य दिवा हा लावला जातो. कारण दिव्या लावल्याने नकारात्मक गोष्टी नाहीशा होतात. ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात दिवा लावताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजे. (Vastu Tips Home Temple How To Lighting Diya nmp)
दिशा लक्षात ठेवा!
शास्त्रानुसार दिवा लावताना दिशेची काळजी घेणे गरजेचं आहे. चुकीच्या दिशेला दिवा लावल्यास तुम्हाला आर्थिक हानी आणि आरोग्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे कायम देवघरात दिवा लावताना पश्चिम दिशेला दिवा लावा.
कुठल्या दिवा लावावा?
देवघरात तुपाचा दिवा लावणे सर्वात शुभ मानलं जातं. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावणे शुभ असतं. तुपाचा दिवा देवाच्या उडव्या बाजूला लावा.
असा दिवा लावणे अशुभ
देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधी लावू नका. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाटी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होतं नाही. शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
दिव्याचा प्रकाशही महत्त्वाचा
दिव्यासोबत दिव्याचा प्रकाशही तेवढ्याच महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही देवघरात तुपाचा दिवा लावत असाल तर फुलवातीचा वापर करा आणि जर तेलाचा दिवा लावत असला तर वातीचा वापर करा. दिव्याच्या प्रकाशाची दिशा नेहमी देवाच्या चित्रासमोर बरोबर असावी , जेणेकरून तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. ज्योतिषशास्त्रात थेट दिवे वापरणे केव्हाही चांगले. दिव्याच्या प्रकाशाची दिशा दक्षिणेकडे ठेवू नये. दिव्याचा प्रकाश कापसाचा असावा. हा दिवा अधिक शुभ मानला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)