Vastu Tips : काम करण्याची जागा अशी करा तयार, जेणेकरून व्हाल मालामाल
व्यवसाय, उद्योग-धंदा करत असताना याचा विचार करावा. वास्तुनुसार कोणती गोष्ट कशी ठेवावी, हे समजून घेणं महत्वाचं आहे.
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार तुमच्या काम करण्याच्या जागेत वास्तूनुसार बदल केल्यास यश हे नक्की मिळतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या व्यवसायात बदल होत असतात. त्यामुळे व्यवसाय, उद्योग-धंदा करत असताना याचा विचार करावा. वास्तुनुसार कोणती गोष्ट कशी ठेवावी, हे समजून घेणं महत्वाचं आहे.
पश्चिम की दक्षिण दिशा
वास्तुशास्त्रानुसार पश्चिम किंवा दक्षिण जागेत तुमची जागा ही खाण्या-पिण्यासाठी किंवा कामासाठी चांगली असते. खाण्या-पिण्यासंबंधीत व्यवसाय असतील तर या दिशांचा विचार करा.
दक्षिण - पूर्व दिशा
महिलांच्या कपड्यांशी संबंधित कामासाठी आग्नेय दिशेला असलेली ठिकाणे चांगली आहेत. याशिवाय मनोरंजनाशी संबंधित कामासाठी उत्तर-पूर्व दिशा शुभ आहे.
दक्षिण - पश्चिम जागेवर बसण्याची जागा
वास्तुशास्त्रानुसार व्यवसाय करण्याच्या ठिकाणी बसण्याची जागा दक्षिण-पश्चिम दिशेला असावी. त्यामुळे व्यवसाय वाढत चालला आहे.
पूजेकरता उत्तर - पूर्व दिशा महत्वाची
व्यवसायाच्या ठिकाणी पूजेसाठी ईशान्य दिशा उत्तम आहे. याशिवाय भेटणाऱ्यांसाठीही हे ठिकाण योग्य आहे. येथे भिंतींवर हलके रंग वापरावेत.
उत्तर ते पूर्व दिशा
तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहात ते ठिकाण नैऋत्य दिशेला नसावे. यासोबतच कामाच्या ठिकाणी वायव्य दिशेला माल तयार करावा. तसेच, उत्तर ते पूर्व दिशा पूर्णपणे स्वच्छ ठेवा.