Shukra Ketu Yuti: कन्या राशीत शुक्र-केतूचा संयोग; ग्रहांच्या युतीने `या` राशींना मिळणार प्रचंड पैसा
Shukra Ketu Yuti In Kanya : कन्या राशीमध्ये केतू आणि शुक्राची युती होणार आहे. हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दोन ग्रहांच्या युतीमुळे अनेक राशींच्या जीवनात अचानक मोठे बदल होऊ शकतात.
Shukra Ketu Yuti In Kanya : शुक्र ग्रह हा स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. संपत्ती, ऐश्वर्य आणि आकर्षण यांमुळे काही काळानंतर राशी बदलत राहतात. प्रत्येक ग्रहाच्या बदलामुळे निश्चितपणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र 3 नोव्हेंबरला पहाटे 4:58 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर केतू आधीच त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे.
यामुळे कन्या राशीमध्ये केतू आणि शुक्राची युती होणार आहे. हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दोन ग्रहांच्या युतीमुळे अनेक राशींच्या जीवनात अचानक मोठे बदल होऊ शकतात. चला जाणून घेऊया शुक्र आणि केतूच्या युतीचा कोणत्या राशींचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
या राशीमध्ये हा संयोग तिसऱ्या घरात तयार होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीसोबतच शुभफळ प्राप्त होणार आहे. कठोर परिश्रम केल्यानंतर आता यश मिळण्याची वेळ आली आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. लव्ह लाईफच्या बाबतीतही तुम्हाला यश मिळू शकते. व्यवसायामध्ये तु्म्हाला भरपूर यश आणि नफा मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
या राशीत शुक्र आणि केतूची युती अकराव्या घरात होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. तसंच तुमच्या संपत्तीत वाढ होईल. नोकरीच्या निमित्ताने बाहेर कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )