Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. नोव्हेंबर 2023 हा महिना ज्योतिष शास्त्रानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. नोव्हेंबरमध्ये, शनि, राहू-केतू आणि शुक्र यांसारख्या महत्त्वाच्या ग्रहांचा सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडताना दिसतो. येत्या 30 ऑक्टोबर रोजी राहु-केतू ग्रहांचं गोचर होणार आहे. यानंतर शुक्राच्या गोचरने नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होतोय. यानंतर 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ अवस्थेत फिरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान नोव्हेंबर महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होताना दिसून येणार आहे. मात्र यावेळी 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहांचं गोचर खूप शुभ राहील. 12 नोव्हेंबरला दिवाळीपूर्वीच या 4 राशींचे लोक दिवाळी साजरी करू शकणार आहेत. यावेळी या लोकांना भरपूर संपत्ती मिळेल. जाणून घेऊया या ग्रहांच्या गोचरमुळे नोव्हेंबर महिना कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे.


नोव्हेंबर महिन्यात या राशींचं नशीब चमकणार


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना शुभ राहणार आहे. या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. काही मोठे बदल देखील करू शकतात. ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि सर्व संबंध सुधारतील.


वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना भाग्यवान ठरू शकणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपुष्टात येऊ शकतात. प्रलंबित पैसेही मिळतील. तुम्ही भौतिक सुखांवर बचत आणि खर्च कराल. या काळात उत्पन्न वाढणार आहे. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे. 


कन्या रास


कन्या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना शुभ परिणाम देणार आहे. तुम्हाला प्रलंबित बोनस मिळू शकतो. कामानिमित्त परदेश दौरा होऊ शकतो. राहणीमान चांगले राहील. यावेळी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील.


कुंभ रास


नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक आनंदाचा असणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील. मुलांकडून आनंद मिळेल. या काळात चांगला नफा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी अधिका-यांचे सकारात्मक सहकार्य मिळेल.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)