Malavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; `या` राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.
Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरने किंवा संयोगाने अनेक राजयोग तयार होतात. असाच येत्या काळात मालव्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रात मालव्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो, त्या व्यक्ती राजासारखं आयुष्य जगतात. शिवाय, त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. दिवाळीनंतर हा राजयोग तयार होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत.
मकर रास (Makar Zodiac)
मालव्य राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या कर्म घरावर तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला करिअरशी संबंधित प्रत्येक बाबतीत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुम्हाला मुलांशी संबंधित बातम्या मिळू शकतात.
तूळ रास (Tula Zodiac)
मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायात धनलाभ होणार आहे. तुम्हाला करिअरशी संबंधित काही सुवर्ण संधी मिळू शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असेल. संशोधनाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. अविवाहितांना यावेळी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
कन्या रास (Kanya Zodiac)
दिवाळीनंतर तयार होणारा मालव्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)