Malavya Rajyog In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी धन, समृद्धी आणि आकर्षण देणारा शुक्र ग्रह एका काळानंतर राशी बदलतो. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काळात शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मालव्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य योग हा पाच महापुरुषांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीने काही लोकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. 31 मार्च रोजी दुपारी 4:54 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणारे ते पाहूयात.


मेष रास (Mesh Zodiac)


मेष राशीच्या लोकांना मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे विशेष लाभ मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.  या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये दुप्पट फायदा होणार आहे. व्यवसायातही यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायातही भरपूर नफा मिळणार आहे. वैवाहिक जीवनात खूप आनंद होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा मिळू शकतो. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 


मकर रास (Makar Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी मालव्य योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. मालमत्तेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. आगामी काळात तुम्हाला पदोन्नती आणि नोकरीसाठी उत्तम संधी मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. शेअर बाजाराशी संबंधित नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे उत्पन्न वाढेल. 


कर्क रास (Kark Zodiac)


मालव्य राजयोगामुळे कौटुंबिक आणि आर्थिक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. यासोबतच भाऊ-बहिणीमध्ये प्रेम राहील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसेही परत मिळू शकणार आहेत. यासोबतच तुमचे लोकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल. हा योग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )