Vipreet Rajyog : एखाद्या ग्रहाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला तर त्याला गोचर असं म्हणतात. ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. नुकतंच बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध ग्रहाच्या गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. विपरीत राजयोग हा एक शुभ राजयोग मानला जातो. ज्या व्यक्तींच्या राशींमध्ये विपरीत राजयोग निर्माण होतो, त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. हे विपरीत राजयोग तीन प्रकारचे आहेत. हर्ष राजयोग, विमल राजयोग आणि सरला राजयोग. दरम्यान हे 2 राजयोग काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अपार धन आणि सुख आणणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अनपेक्षित धनासाठी लाभदायक राहील. हा काळ तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. पुढे जाण्याच्या अनेक संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. घरात खूप पैसा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.  या काळात अनेक जुन्या समस्यांचे निराकरण होईल. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्य घडण्याची शक्यता आहे.


सिंह रास


सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या विक्रीतून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात अनपेक्षित नफा होऊ शकतो. तुमच्यामध्ये साकारात्मक उर्जेचा संचार होऊ शकतो. आर्थिक समृद्धी, फायदेशीर प्रयत्न आणि रोमांचक आंतरराष्ट्रीय प्रवासाची शक्यता अपेक्षित आहे. तुम्ही ठरवलेली सर्व कामं पूर्ण होऊ शकणार आहे. 


वृश्चिक रास


नोकरी किंवा व्यवसायातून अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये खूप प्रगतीची चिन्ह आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे. येणाऱ्या काळात या राशीच्या राशीच्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. तुमच्यासाठी हा काळ कुटुंबात आनंदाने भरलेला असेल आणि वैवाहिक सुख परिपूर्ण असेल. शोध करणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.


मकर रास


विपरीत राजयोग हा या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. पती-पत्नीमधील सततचा तणाव दूर झाला तर प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. आयुष्य तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीचा मोठा फायदा होईल. रिअल इस्टेटशी संबंधित असलेल्यांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )