Vishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. आज दुर्गेची दुसरी शक्ती ब्रह्मचारिणी रुपाची पूजा केली जाणार आहे. तर पंचांगानुसार चंद्र तूळ राशीमध्ये आहे. इथे ग्रहांचा सेनापती मंगळ आधीच उपस्थित आहे. चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे लक्ष्मी योग तयार होईल. तसेच कन्या राशीत बुध आणि सूर्य असल्यामुळे बुधादित्य योगही तयार होईल. यासोबतच आज शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी  विष्कुंभ, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. हा पाच राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Vishkumbha and Preeti Yoga in Navratri monday 16 october Wealth on people of 5 signs zodiac)


 मेष (Aries Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांवर माँ दुर्गेचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. आरोग्याच्या समस्या नाहीसा होणार आहेत. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये प्रगतीच्या शुभ संधी निर्माण होणार आहे. तुम्ही कर्जफेड करु शकणार आहात. नवरात्रीमुळे घरात धार्मिक वातावरण असणार आहे. एखाद्या सामाजिक संस्थेकडून लाभ मिळणार आहे. 


सोमवारचा उपाय : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी पाच बेलच्या पानांवर पांढर्‍या चंदनाचा ठिपका लावून शिवलिंगावर अर्पण करा आणि शिवाष्टकांचे पठण तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी अतिशय आनंददायी आहे. या लोकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिक लाभ होईल. लव्ह लाईफमध्ये जवळीक वाढणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळेल. व्यावसायिक जीवनात चांगली प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण होईल. अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढणार आहे. 


सोमवारचा उपाय : अडथळे दूर करण्यासाठी सोमवारी उपवास करा. शिवलिंगावर गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करा. सकाळ संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्ष जपमाळेसह महामृत्युंजय मंत्राचा जप करा.


सिंह (Leo Zodiac) 



या राशीच्या लोकांना शुभ योगाच्या आज धनलाभ होणार आहे.  कुटुंबातील एखाद्या सदस्याला आज सरकारी नोकरी मिळेल. त्यामुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण असणार आहे. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होणार आहे. या राशीच्या लोकांचा आज आत्मविश्वास वाढणार आहे.


सोमवारचे उपाय : कुटुंबात सुख-शांती राहण्यासाठी गव्हाचे पीठ, तूप आणि साखरेपासून बनवलेल्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करा. त्यानंतर ते गरीब आणि गरजू लोकांमध्ये दान करा. 


तूळ (Libra Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी आज संपत्ती वाढ होणार आहे. तुमचा मान-सन्मानही वाढणार आहे. नोकरदार लोकांचे अधिका-यांशी संबंध चांगले होणार आहे. नवीन मालमत्ता खरेदी करणार आहात. मुलाच्या प्रगतीने आनंद मिळणार आहे. व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. एखाद्या नातेवाईकाकडून अडकलेले पैसेही परत मिळणार आहे. 


सोमवारचा उपाय : सोमवारी व्रत ठेवा आणि शिवलिंगावर अक्षत, बेलची पाने, गंगाजल, दूध, फळे इत्यादी अर्पण करा. यानंतर मंदिरात सुके खोबरे अर्पण करा. 


हेसुद्धा वाचा - Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनी गोचर! अशुभ योगामुळे 5 राशींनी अखंड राहावं सावध


धनु (Sagittarius Zodiac)


या राशीचे लोकांना व्यवसायात फायदा होणार आहे. जीवनात नवीन संधी मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले होणार आहेत. तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा असणार आहे. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होईल. व्यावसायिकांना पैशाचा ओघ वाढणार आहे. 


सोमवारचा उपाय : व्यावसायिक प्रगतीसाठी शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडीशी रक्कम भरून ओम नमः शिवाय म्हणत व्यापाराच्या ठिकाणी शिंपडा.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)