Bhagavad Gita: हे माहितीये का? श्रीकृष्णानं अर्जुनाआधी कुणाला दिलेलं भगवतगीतेचं ज्ञान?
भगवतगीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने कुणाला उपदेश दिलेला असा प्रश्न तुम्हाला विचारला तर अर्थात उत्तर येईल अर्जुनाला. मात्र श्रीकृष्णाने सर्वात आधी भगवतगीतेचं ज्ञान कुणाला दिलेलं, असं तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल का?
भगवतगीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने कुणाला उपदेश दिलेला असा प्रश्न तुम्हाला विचारला तर अर्थात उत्तर येईल अर्जुनाला. मात्र श्रीकृष्णाने सर्वात आधी भगवतगीतेचं ज्ञान कुणाला दिलेलं, असं तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल का? आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला याबाबतच काही गोष्टी सांगणार आहोत.
श्रीकृष्णाने सर्वात आधी भगवतगीतेचा उपदेश हा सूर्यदेवाला दिला होता. मात्र, जेंव्हा भगवान सूर्याला श्रीकृष्णाने उपदेश दिला तेंव्हा श्रीकृष्णाने पृथ्वीवर राजाच्या रूपात जन्म घेतलेला.
सर्वसाधारणपणे भगवतगीतेबाबत अशी मान्यता आहे की, सर्वात आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं. मात्र तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की अर्जुनाआधी श्रीकृष्णाने गीतेतील उपदेश सूर्यदेवाला दिलेला. त्यावेळी श्रीकृष्णाने पृथ्वीवर एक राजा म्हणून जन्म घेतलेला.
श्रीकृष्णाने जेंव्हा अर्जुनाला गीतेतील उपदेश दिलेला तेंव्हा हा उपदेश सूर्यदेवाला याआधीच दिल्याचं सांगितलंय. तेंव्हा अर्जुन आश्चर्यचकित झालेले. त्यांनी श्रीकृष्णाला याबाबत विचारलं, "सूर्यदेव तर प्राचीन देवता आहेत, मग ते कसे हा उपदेश ऐकू शकतात?", त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं की, "आपले या आधीही जन्म झालेले आहेत. अर्जुना तू त्या जन्मांबाबत जाणत नाहीस, पण मी जाणतो."
महाभारतातील युद्धाच्या आधी जेंव्हा भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रातील मैदानात अर्जुनाला भगवतगीतेचा उपदेश देत होते, तेंव्हा दिव्य दृष्टीने संजय तिथल्या सर्व घडामोडी पाहून धृतराष्ट्रांना ऐकवत होते.
जेंव्हा महर्षी व्यास यांना महाभारताची रचना करण्याचा विचार आला, तेंव्हा भगवान ब्रह्मा यांनी व्यास यांना श्रीगणेशाला आवाहन करण्यास सांगितलं. महर्षी व्यास हे बोलत होते आणि श्रीगणेश लिहीत होते. यावेळी महर्षी वेदव्यास यांनी श्रीगणेशाला गीतेचा उपदेश दिलेला.
भगवान श्रीकृष्णाने अवघ्या 45 मिनिटांमध्ये अर्जुनाला गीतेचं संपूर्ण ज्ञान दिलेलं. ज्यावेळी कृष्णाने अर्जुनाला हे ज्ञान दिलेलं तेंव्हा मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची एकादशी आणि रविवार होता.
वरील लेख Zee News Hindi च्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे लिहिला गेलाय.
bhagavad gita, lord shrikrishna and arjuna, knowledge imparted in the Bhagavad Gita, Bhagavad Gita interesting facts
Was Arjuna the first to learn the knowledge imparted in the Bhagavad Gita