Wedding Muhurat : विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर, पाहा नवीन वर्षातील लग्नाचे मुहूर्त
Marriage Muhurat : लग्न करणाऱ्या इच्छुकांसाठी आता एक खूशखबर.
Shubh Vivah Muhurat : लग्न करणाऱ्या इच्छुकांसाठी आता एक खूशखबर. नवीन वर्षात लग्नाचे मुहूर्त खूप आहेत. (Wedding Muhurat in New year 2023) यावर्षी तब्बल 8 महिने सनई चौघडे वाजणार आहेत. (Marriage) जुलै ते ऑक्टोबर हे महिने वगळले तर आठ महिने लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे यावर्षभरात लग्न समारंभांची मोठी धूम पाहायला मिळेल. हिंदू धर्मात लग्नाला खूप महत्व आहे. लग्न हे शुभ मुहूर्तावर लावले जाते. त्यासाठी विवाह मुहूर्त काढले जातात. नवीन वर्ष आजपासून सुरु झाले आहे. 2023 मध्ये कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखांना लग्नाचे मुहूर्त (Shubh Vivah Muhurat 2023) आहेत ते जाणून घ्या.
हिंदू पंचांगानुसार 2023 मध्ये लग्नासाठी 64 शुभ मुहूर्त आहेत. (Shubh Vivah Muhurat 2023) त्यापैकी जानेवारीमध्ये 9, फेब्रुवारीमध्ये 13, मार्चमध्ये 6, मेमध्ये 13, जूनमध्ये 11, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 7 लग्नाच्या शुभ मुहूर्त ठरत आहेत.
2023 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे -
जानेवारी 2023 - 15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30, 31
फेब्रुवारी 2023 - 6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22 23, 28
मार्च 2023 - 1, 5,6, 9,11, 13. मे 2023 - 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29, 30
जून 2023 - 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27
नोव्हेंबर 2023 - 23, 24, 27, 28, 29
डिसेंबर 2023 - 5, 6, 7 8, 9, 11, 15
2023 मध्ये या महिन्यांत लग्न होणार नाही -
एप्रिल 2023 - या महिन्यात गुरु तारा मावळत आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना ते 5 मे पर्यंत लग्न होणार नाहीत.
जुलै 2023 - जुलै महिन्यात चातुर्मास सुरु होत आहे. या महिन्यापासून भगवान विष्णू पुढील चार महिने योग निद्रामध्ये जातील.
ऑगस्ट 2023 - या महिन्यात चातुर्मास सोबतच शुक्र नक्षत्र अस्त करेल
सप्टेंबर 2023 - या महिन्यात चातुर्मासासह सौर महिना प्रतिबंधित आहे. त्यामुळे शुभ कार्ये वर्ज्य आहेत.
ऑक्टोबर 2023 - या महिन्यात निषिद्ध सौर महिना देखील आहे. 2023 मध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मासामुळे मांगलिक कामे सुरुवातीला होणार नाहीत.