Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा? `या` तीन राशींना धनवान होण्याची संधी
तुमची रासही यात आहे का?
Weekly Horoscope 15 to 21 August 2022: ऑगस्ट महिन्यातील तिसरा आठवडा संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देशानं स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. सोबतच आता नव्या धेय्यांच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरु झाली आहे. हा संपूर्ण आठवडा ज्योतिष विद्येच्या अनुषंगानंही महत्त्वाचा आहे. 18 ऑगस्टला सूर्याचं गोचर आणि ग्रहांची स्थिती पाहता 3 राशीच्या व्यक्तींना धनलाभ योग आहे.
कोणत्या आहेत या शुभराशी?
वृषभ- वृषभ राशीसाठी हा आठवडा सुरुवातीपासून धनाची बरसात करणारा असेल. कोणत्या न कोणत्या ठिकाणहून तुम्हाला अचानकच धनलाभ योग आहे. अर्थार्जनाचा नवा स्त्रोत मिळणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत.
कुंभ- कुंभ राशीसाठी हा आठवडा शुभ आहे. प्रत्येक अडचण दूर होणार आहे. आर्थिक समस्या दूर होणार आहेत. नातेसंबंध सुधारतील. गुरुवारचा दिवस शुभ आहे. कामकाजावर लक्ष द्या.
भाद्रपद महिन्यात टाळा हे अशुभ कामं! अन्यथा आयुष्यात येऊ शकतात संकट
मीन- आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. अचानकपणे कोणा एका व्यक्तिकडून पैसे मिळणार आहेत. अर्थार्जनात वाढ होणार आहे. संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमच्या आर्थिक पाठबळाची कुणा एका व्यक्तीला मोठी मदत होणार आहे.