Weekly Horoscope 13 to 19 may 2024 in Marathi : गंगा सप्तमी, सीता जंयती आणि सूर्य संक्रमणाचा हा आठवड्यात गुरु आदित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगचा शुभ संयोगचा असणार आहे. या दुहेरी संयोगामुळे काही राशींसाठी हा आठवडा प्रचंड आर्थिक लाभाचा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती तर व्यवासायिकांना नवीन उंची गाठणारा हा आठवडा ठरणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्यात तुमच्या कुटुंबाला फायदा होणार आहे. जुने कौटुंबिक वाद मिटविण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. मित्रांसोबत कौटुंबिक भेटीमुळे तुमची नातं सुधारणार आहे. या आठवड्यात तुमचा आदर वाढवायचा असाल तर तुम्हाला कुटुंबाचे हित लक्षात घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहे. तुमचं मन आध्यात्मिक गोष्टींमध्ये रमणार आहे. 


शुभ दिवस : 13,14,17


वृषभ (Taurus Zodiac) 


या राशीचे लोक त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तणावात असणार आहे. या आठवड्यात तुम्ही बाहेर जाण्याचा बेत आखणार आहात. प्रवासामुळे शारीरिक थकवा जाणवणार असून आरोग्यातही बिघाड होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही कामात व्यस्त राहणार आहात. तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी वेळ नसल्यामुळे तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या त्रासदायक ठरणार आहे. 


शुभ दिवस : 13


मिथुन (Gemini Zodiac)


या आठवड्यात सावधपणे वाहन चालवा शिवाय लांबचा प्रवास टाळणं तुमच्यासाठी हिताच ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या आरोग्याची आणि पोषणाची आवश्यक घ्या. कुटुंबातील सदस्याचे बिघडलेले आरोग्य तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. तुमच्या अस्वस्थतेमुळे या आठवड्यात तुम्ही काही राजकीय किंवा प्रशासकीय मतभेदात अडकण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या कंपनीला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्त्वाच्या मालमत्तेत किंवा व्यवहारात सध्या गुंतवणूक टाळा. 


शुभ दिवस : 13,14,15,16


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांना या आठवड्यात फायदा होणार आहे. या आठवड्यात तुमच्याकडे नवीन कल्पना तुम्हाला उर्जा देणाऱ्या ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे आयुष्य बदलण्यात यशस्वी होणार आहात. या आठवड्यात मोठ्या फायद्यासाठी तुमचं वागणूक बदलणं हिताच ठरेल. तुमचे वागणे पाहिल्यानंतर तुमचे विरोधक तुम्हाला पसंत करु शकतात. या आठवड्यात तुम्हाला काही सामाजिक-राजकीय कार्य सोपवलं जाणार आहे. कुटुंबासाठी हा आठवडा अनुकूल राहणार आहे. एखाद्या शुभ कौटुंबिक कार्यक्रमामुळे घरी पाहुणे येणार आहात. 


शुभ दिवस: 13,17


सिंह (Leo Zodiac) 


या आठवड्याची सुरुवात छान होणार आहे. निरोगी आणि सकारात्मक उर्जेमुळे तुमच्या कामात यश मिळणार आहे. तुम्हाला मदत करण्याच्या अद्वितीय व्यक्तीची गाठभेट होणार आहे. व्यवसायात उत्पन्नात वाढ होणार आहे. तुम्हाला एखादी मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. कार, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. कौटुंबिक जीवन चांगले असणार आहेत. 


शुभ दिवस: 13,16


कन्या (Virgo Zodiac)    


हा आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या. भावनिक ताण जाणवणार आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सदस्याचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. या आठवड्यात व्यवसायात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आपण कोणतेही मोठे सौदे चुकूनही करु नका. या आठवड्यात कामाची जागा बदलू नका. कौटुंबिक मतभेद आणि वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात वाणीवर नियंत्रण ठेवणे तुमच्या हिताच ठरेल. 


शुभ दिवस: 13,17


तूळ (Libra Zodiac)  


आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या आहारावर लक्ष ठेवाव लागणार आहे. या आठवड्यात दारू पिणे टाळल्यास बरं होईल. या आठवड्यात वाद तुम्हाला घेरणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला काही वादाला सामोरे जावं लागणार आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर यश मिळवता येईल. या आठवड्यात कुटुंबात नवीन नात्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. 


शुभ दिवस: 13,14,15


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


या आठवड्यात तुमच्यासाठी वेळ अनुकूल असणार आहे. आरोग्य आणि मनोबल उत्तम असणार आहे. अध्यात्म तुम्हाला आकर्षित करणार आहे. तुमचे कुटुंब समृद्ध आणि तुम्ही कामात प्रगती करणार आहात. व्यवसायात नफा मिळणार आहे. तुम्हाला मोठ्या सहकार्याचा फायदा होणार आहे. एखादा मोठा प्रकल्प सुरु करणे फायद्याच ठरेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत पैसे मिळवण्यात यशस्वी होणार आहात. तुमचे कुटुंब तुमचा आदर करणार आहे. 


शुभ दिवस: 13,14,15,17


धनु (Sagittarius Zodiac) 


तुमचा आठवडा चांगला जाणार आहे. तुमचे काम पूर्ण होणार असून नियोजित कामंही सहज मार्गी लागणार आहे. या आठवड्यात कुटुंबीय काही धार्मिक कार्यक्रम होणार आहे. हा आठवडा पाहुण्यांमध्ये व्यस्त असणार आहे. ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे. कुटुंबासोबत हा आठवडा आनंदात जाणार आहे. एखाद्या अनोख्या सामाजिक-राजकीय व्यक्तिमत्त्वाशी तुमची भेट होणार आहे. 


शुभ दिवस: 13,16,17


मकर (Capricorn Zodiac)   


या आठवड्या धावपळीचा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला थकवा आणि अस्वस्थता जाणवणार आहे. या आठवड्यात कामात यश मिळवणे तुमच्यासाठी कठीण असणार आहे. जुनै कौटुंबिक वाद मिटविण्यात यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. काही लोकांना मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावणार आहे. 


शुभ दिवस : 14,16,17


कुंभ (Aquarius Zodiac) 


कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करुन घ्या. तरच हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरेल. अन्यथा तुमचा निर्णय संकटात आणणारा असणार आहे.  कुटुंबात मतभेद होऊ शकतात. तुमच्या वागण्यामुळे तुमचा नवरा आणि मुलं तुमच्यावर चिडणार आहे. या आठवड्यात मन अस्वस्थ आणि उदास असणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वाद टाळा तरच बरं होईल. 


शुभ दिवस: 13,14,15,17


मीन  (Pisces Zodiac)  


या आठवड्यात तुमच्यासाठी महत्त्वाच्या कामात यश मिळणार आहे. तुमचे विचार संतुलित असणार आहे. हा आठवडा तुम्हाला कामावर आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. ज्याचा तुम्हाला दीर्घकाळ फायदा होणार आहे. तुमच्या निर्णयाबद्दल तुमचे कुटुंब तुमचं कौतुक करणार आहे. लोक तुमच्या कार्यशैलीवर आणि वागण्याने खूश असणार आहेत. जोडीदारासोबत सुरू असलेले वाद संपुष्टात येणार आहे. 


शुभ दिवस: 13,14,16


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)