Weekly Horoscope 20 to 26 may 2024 in Marathi : मे महिन्याच्या या आठवड्याची सुरुवात ही सोम प्रदोष व्रताने होणार आहे. त्यात या आठवड्यात मालव्य राजयोग, त्रिग्रही योग आणि गजलक्ष्मी राजयोग असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 12 वर्षांनी वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. असा अतिशय लाभाचा आठवडा मेष ते मीन राशीसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार आहे. आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक समस्याने तुम्ही त्रस्त असणार आहा. कुटुंब किंवा मित्रांकडून वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सक्रिय असाल. कामाच्या ठिकाणी प्रगती करणार आहात. आर्थिकबाबत बोलायचं झालं तर नवीन गुंतवणुकीतून यश मिळेल. या आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडणार आहेत. 


शुभ दिवस: 20,22,24


वृषभ (Taurus Zodiac) 


या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात यशस्वी होणार आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असेल. या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेणं टाळा. जास्त कर्ज नका अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आर्थिक बाबतीत हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. पैशाशी संबंधित व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. 


शुभ दिवस: 22,24


मिथुन (Gemini Zodiac)


आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्न वाढवणारी ठरणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धकांना वेळेचा फायदा होणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे काम पूर्ण होणार आहे. आठवड्याचा मध्य भाग व्यस्त असणार आहे. जास्त खर्च केल्याने आर्थिक समस्या उद्भवू आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. समतोल राखून आर्थिक बाबतीत गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. आहाराकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. 


शुभ दिवस: 20,23,24


कर्क (Cancer Zodiac)   


या आठवड्याची सुरुवात यशाने होणार आहे. चांगल्या नोकरीची ऑफर किंवा नवीन करार होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळणार आहे. कुटुंबात काही अनपेक्षित आनंदी बातमीने मन प्रसन्न होणार आहे. आठवड्याच्या मध्यात आरोग्याशी संबंधित समस्या त्रासदायक ठरतील. आर्थिक बाबतीत मनाचे ऐकून निर्णय घेतल्यास यश अवश्यक मिळेल. कुटुंबातील तरुणांच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धी येणार आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय आठवड्याच्या शेवटपर्यंत पुढे ढकल्याने चांगले परिणाम मिळतील. 


शुभ दिवस: 21,22


सिंह (Leo Zodiac) 


आठवडाभर तुम्हाला संमिश्र परिणाम दिसणार आहे. तुमच्या निर्णयाचे कौतुक होणार आहे. तुमचा दयाळू स्वभाव तुम्हाला कठीण प्रसंगांना बाहेर निघण्यास मदत करेल. कौटुंबिक कलह आठवड्याच्या मध्यात तुम्हाला विचलित करु शकतात. आठवड्याच्या शेवटी काम करण्याची चांगली संधी मिळणार आहे. या आठवड्यात संयमाने कोणताही निर्णय घेतल्यास चांगले परिणाम दिसणार आहे. तुमचा संयम आणि तुमची युक्ती तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारा असणार आहे. प्रवासातूनही शुभ परिणाम दिसणार आहेत. आर्थिक बाबींमध्येही अचानक अडचणी येऊ शकतात आणि हा आठवडा खर्चिक असणार आहे. 


शुभ दिवस: 22,23


कन्या (Virgo Zodiac)    


आठवड्याच्या सुरुवातीला मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी ठरणार आहे. महागडी वस्तू खरेदी करणार असून मालमत्तेचे प्रश्न निकाली लागणार आहे. परदेशी कंपनीची सेवा आणि नागरिकत्व अर्ज यशस्वी होणार आहे. आरोग्याशी संबंधित कौटुंबिक समस्यांमुळे भावनिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्चही जास्त असणार आहे. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवले तर चांगले परिणाम दिसून येतील. 


शुभ दिवस: 23,25


तूळ (Libra Zodiac)  


संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कृती आणि निर्णय काळजीपूर्वक विचार करुन घ्यावे. जिद्द आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम केल्याने यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. पदोन्नती आणि नवीन करार होतील. सप्ताहाच्या मध्यात तुम्ही यशस्वी व्हाल, तरीही मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवणार आहे. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहणार असून तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. कुटुंबात परस्पर मतभेद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी स्थितीत सुधारणा होणार आहे. 


शुभ दिवस: 20,21,23


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


तुम्हाला आठवडाभर आश्चर्याचा अनुभव मिळणार आहे. तुम्ही ज्या कामाची वाट पाहत आहात ते सहज पूर्ण होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला जास्त प्रवास घडणार आहे. चैनीच्या गोष्टींवर या आठवड्यात अधिक खर्च होणार आहे. सामाजिक जबाबदारी आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. आर्थिक बाबतीत आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. कामाच्या ठिकाणी निराशा वाढण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग असणार आहेत. 


शुभ दिवस: 22,24


धनु (Sagittarius Zodiac) 


नवीन आठवडा हा धनु राशीच्या लोकांसाठी अधिक खर्चिक ठरणार आहे. कर्ज परतफेडीचे पुरावे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. डोळ्यांकडे लक्ष द्या. या आठवड्याच्या मध्यात तुमच्या निर्णय आणि मेहनतीची प्रशंसा होणार आहे. वरिष्ठांशी चांगले संबंध तुम्हाला हिताचे ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. कुटुंबात परस्पर प्रेम वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत. या आठवड्यात, प्रवासामुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आनंददायी काळ असणार आहे. 


शुभ दिवस: 22,24


मकर (Capricorn Zodiac)   


या आठवड्याची सुरुवात ही यशस्वी होणार आहे. घरातील मोठ्या भावडासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कर्ज परतफेड करण्यासाठी या आठवड्यात धडपड करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. मुलांची कर्तव्ये पार पाडणार आहात. तर नवीन जोडप्याला आनंदीची बातमी मिळणार आहे. या आठवड्यात आर्थिक संपत्ती वाढण्याची शुभ संकेत आहेत. गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे. या आठवड्यात मोठ्या व्यक्तीकडून आर्थिक लाभ होईल. प्रवासातून तुम्हाला यश मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल आणि आनंददायी काळ असणार आहे. 


शुभ दिवस: 21,24


कुंभ (Aquarius Zodiac) 


हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी असणार आहे. कार्यक्षेत्रातील प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहात. या आठवड्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. चैनीच्या वस्तूंमध्ये खर्च होणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या ज्येष्ठाच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग येणार आहे. प्रेमसंबंधात, मातृत्व स्त्रीमुळे परस्पर द्वेष निर्माण होण्याची शक्यता आहे.  कुटुंबातील कोणत्याही मुलाबद्दल तुम्हाला वाईट वाटणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. 


शुभ दिवस: 21,23,24


मीन  (Pisces Zodiac)  


आठवडाभर यश मिळणार आहे. काही आरोग्य समस्या सुरुवातीला असतील त्यानंतर कमी होतील. सरकारी विभागांची कामे पूर्ण होणार आहे. तुमच्यासाठी न्यायालयीन विजयाची चिन्हे दिसून येत आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि या आठवड्यात तुम्हाला प्रियजनांची मदत मिळणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहात. मात्र गुंतवणूक टाळा. या आठवड्यात आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती तयार होते आहे. कुटुंबातील स्त्रीमुळे परस्पर प्रेम वाढणार आहे. 


शुभ दिवस: 20,22


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)