मुंबई: सप्टेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा 4 राशींसाठी खूप शुभ असणार आहे. 2 राशींच्या व्यक्तींसाठी तर मदतीतून यश प्राप्त होणार आहे. अॅस्ट्रो गुरू बेजान दारूवाला यांचे सुपुत्र चिराग दारूवाला यांनी 12 राशींसाठी हा शेवटचा आठवडा कसा असणार आहे याची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: गणेशजींच्या मते, चांगली बातमी मिळण्याची शक्यता. नव्या गोष्टींकडे आकर्षण वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा. वैवाहिक जीवन सुखद असेल.


वृषभ: गणेशजींच्या मते, व्यवसाय क्षेत्रात नफ्याची संधी आहे. तुम्हाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.


मिथुन: गणेशजींच्या मते, व्यवसायात सकारात्मक स्थिती असेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने सुख समाधान राहील. हाती घेतलेलं काम सहज पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.


कर्क: गणेशजींच्या मते, नफ्याची संधी येईल. व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी आपला फायदा होईल. आपल्या उत्तम वक्तृत्वाने आपण काम पूर्ण करू शकता. 


सिंह: गणेशजींच्या मते, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही विरोधकांवर मात कराल. देवावरील तुमची श्रद्धा वाढेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मकता मिळेल. 


कन्या: गणेशजींच्या मते, तुम्ही दिलेल्या सल्ल्याने इतरांचा फायदा होईल. तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. आत्मचिंतनाची गरज आहे. 


तुळ: गणेशजींच्या मते, कामाच्या ठिकाणी सामान्य परिस्थिती राहील. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल. इतरांना मदत करा. 


वृश्चिक: गणेशजींच्या मते, या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार नाही. उच्च पदावर बसलेल्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे.


धनु: गणेशजींच्या मते, या आठवड्यात आपल्या जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. तुम्ही आनंदी असाल. बौद्धीक क्षमता चांगली राहणार आहे. विद्यार्थ्यांना चांगली मेहनत कामी येईल. कोणतंही काम करण्यापूर्वी विचार करा. 


मकर: गणेशजींच्या मते, पैशांची चणचण जाणवेल. कर्ज घेण्याचा विचार करू शकता. या आठवड्यात मुलांकडून चांगली बातमी मिळेल.


कुंभ: गणेशजींच्या मते, या आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुम्हाला पूर्वीपेक्षा कुटुंबातील सदस्यांकडून अधिक प्रेम, आदर आणि समर्थन मिळेल. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील.


मीन: गणेशजींच्या मते, हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला राहील. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यवसायात लाभ होईल. मन प्रसन्न राहील.