Horoscope Weekly (31 July to 06 August 2023): येत्या 31 जुलैपासून नवा आठवडा सुरु होणार आहे. या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती नवी काम हातात घेतली. तर काहींनी घरात वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत तुमच्या नोकरीत विस्तार मिळेल. जीवनात सकारात्मक बदलाचा स्वीकार करा. शुक्रवार ते शनिवार पैसा येण्याची चिन्हे आहेत. 


वृषभ (Taurus)


नोकरीत आपली स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहा. या आठवड्यात व्यवसायाशी संबंधित काही मोठे काम येणार आहे.


मिथुन (Gemini)


या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो. पैशाची आवक कमकुवत राहणार आहे. वरीष्ठ अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो. जबाबदाऱ्यांमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या


कर्क (Cancer)


या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मन प्रसन्न ठेवण्यासाठी या आठवड्यात सर्व प्रयत्न करावे लागतील. नोकरीत तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते. नवीन काम सुरू केले नाही तर बरे होईल. कुटुंबाला पूर्ण सहकार्य करावे लागेल. 


सिंह (Leo)


हा आठवडा तुमच्यासाठी समृद्ध असणार आहे. जुन्या काळापासून रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत लाभाच्या स्थितीत राहाल. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी राहाल. धनलाभ होईल.


कन्या (Virgo)


हा आठवडा थोडा व्यस्त असणार आहे. कौटुंबिक कामातून धावपळ करावी लागेल. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा या आठवड्यातही होत राहील. वैयक्तिक नातेसंबंध दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भागीदारीत कोणतेही काम सुरू करू नका.


तूळ (Libra)


या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांना मदत करावी लागू शकते. लहान भावंडांना कर्ज द्यावे लागू शकते. स्वतः आर्थिक समस्यांशी संघर्ष करत राहाल. अचानक काही कामासाठी मोठ्या रकमेची गरज भासू शकते. 


वृश्चिक (Scorpio)


हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जुन्या अडचणी दूर झाल्या तर काही नवीन येऊ शकतात. स्वत:बाबत कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आर्थिक स्थितीत नक्कीच काही सुधारणा होईल. 


धनु (Sagittarius)


गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत हा आठवडा अनुकूल आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. कामात आणि जबाबदाऱ्यांमध्येही बदल होऊ शकतो. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. 


मकर (Capricorn)


या आठवड्यात अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल परंतु पूर्णपणे सुधारणार नाही. मनात काही संभ्रम असेल तर कुटुंबासोबत बसून सोडवा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 


कुंभ (Aquarius)


आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल. भावंडांची मदत करावी लागू शकते. वैवाहिक जीवनातील संघर्ष दूर होतील. अविवाहित लोकांच्या लग्नाची बाब निश्चित केली जाऊ शकते. नोकरीत मोठ्या बदलाची वेळ आली आहे. नवीन प्रेम प्रस्ताव मिळू शकतात. 


मीन (Pisces)


आठवड्याची सुरुवात थोडी व्यस्त असेल. मानसिक शांती लाभेल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. नवीन काम सुरू करू शकाल. कठोर परिश्रमाचे शुभ फळ मिळणार आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा शुभ आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )