Weekly Career Horoscope 20 to 26 November 2023 :  दिवाळीनंतरचा हा आठवड्यात आदित्य मंगल राजयोग आणि देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग काही राशींसाठी आर्थिक फायदा घेऊन येणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 20 to 26 november adityamangal yog and mahalakshmi yoga will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign)


मेष (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्यात आर्थिक बाबतीत उत्तम असणार आहे. तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी मिळणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे सुखद अनुभवासोबत फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत. 


शुभ दिवस : 26


वृषभ (Taurus Zodiac) 


हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन आला आहे. गुंतवणुकीतून आणि तुमच्या आर्थिक नफ्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या आठवड्यातील सहली पुढे ढकलं फायद्याचं ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जीवनात थोडे चांगले परिणाम दिसणार आहे. तुम्ही तुमच्या मनासारखं काम करा त्यातून तुम्हाला फायदा होईल. 


शुभ दिवस: 23, 26


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांना हा आठवडा करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. तुमचा समाजात आणि कामाच्या ठिकाणी मान सन्मान द्विगुणीत होणार आहे. या आठवड्यात सुरू झालेला कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक फायद्यासाठीही हा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यातील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यातील प्रवासाचेही चांगले परिणाम देणार आहे.  


शुभ दिवस: 25,26


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती घेऊन येणार आहे. या आठवड्यापासून तुमची आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. आतापर्यंतच्या मेहनतीचं शुभ फळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासामुळे त्रास होणार आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक खर्च जास्त होणार आहे. 


शुभ दिवस: 22, 24


सिंह (Leo Zodiac) 


या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांसाठी कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार असून संपत्तीत वाढ होणार आहे. तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात अहंकाराचं भांडण टाळणं तुमच्यासाठी हिताचं ठरेल. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात सुख आणि आनंद घेऊ येणार आहे. 


शुभ दिवस: 21, 25


कन्या (Virgo Zodiac) 


कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात उत्तम असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्तम संधी लाभणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असणार आहे. तुमच्या कानावर काही चांगली बातमी पडणार आहे. तुमचा प्रवास यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. हा आठवडा तुम्हाला खर्चिक ठरणार आहे. 


शुभ दिवस: 24,25,26


तूळ (Libra Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. या आठवड्यात केलेले प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत खरेदी करणार आहात. आर्थिक लाभ संधीचा हा आठवडा आहे. भावनिक कारणांमुळेही कामाच्या ठिकाणी समस्या मात्र वाढू शकते. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. 


शुभ दिवस: 25


वृश्चिक (Scorpio Zodiac)


या आठवड्यापासून वृश्चिक राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी बदल घेऊन येणार आहे.  तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित करण्यात यशस्वी होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश प्राप्त होईल. आर्थिक खर्च वाढणार आहे. वडिलांच्या प्रकृतीवर जास्त खर्च होणार आहे. 


शुभ दिवस: 26, 22


धनु (Sagittarius Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. प्रवासात अडचणी वाढणार आहे. आर्थिक बाबतीत, हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. कोणत्याही मालमत्तेवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. आठवड्याच्या आनंदाने मन प्रसन्न होणार आहे. 


शुभ दिवस: 23, 25


मकर (Capricorn Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात होणार आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी जाणार आहात. प्रवासातून सुखद आणि आनंदी अनुभव येणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च अधिक होणार आहे. 


शुभ दिवस: 23, 25


कुंभ (Aquarius Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेषतः यशस्वी असणार आहे. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहे. या आठवड्यात प्रवासात यश मिळणार आहे. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम असणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ हळूहळू सुधारणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडथळे येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी, आनंददायी वेळ जाणार आहे. 


शुभ दिवस: 21, 24


मीन (Pisces Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. सुरुवातीला कोणत्याही नवीन गुंतवणुकीबद्दल तुम्ही चिंतेत असणार आहे. मात्र गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रवासासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 


शुभ दिवस: 23,24



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)