Horoscope Money Weekly (28 August to 3 September) : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य...(weekly money career horoscope28 August to 3 September 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Dhan Yog astrological predictions in marathi)


मेष (Aries)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय फलदायी असणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणूक करताना मनात संभ्रम राहील मात्र तुम्ही योग निर्णय घ्या. इच्छेनुसार आयुष्यात बदल होणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. 


शुभ दिवस: 29, 30, 31


वृषभ (Taurus) 


हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि मान सन्मान घेऊन येणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार असून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मात्र या आठवड्यात खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. प्रवासाचे योग आहेत. आठवड्याच्या शेवटी ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. 


शुभ दिवस: 28, 31


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. शिवाय समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. या आठवड्यात एखादा नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन आला आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा शुभ असून तुमचा बँक बॅलेन्स वाढणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. 


शुभ दिवस: 28, 31


कर्क (Cancer)


हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत फलदायी असणार आहे. अनेक ठिकाणाहून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. मात्र गुंतवणूक करताना सावध राहा. प्रवासातून सकारात्मक परिणाम दिसणार आहे. कामाच्या ठिकाणी कुठल्या तरी बातमीने मन उदास होईल. अनोळखी व्यक्तीची भेट होणार असून भविष्यात त्या व्यक्तीकडून फायदा होणार आहे. 


शुभ दिवस: 28, 29, 31


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ ठरणार आहे. या लोकांना धनलाभाचे योग आहेत. मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करा. भविष्याबद्दल निर्णय घेणार आहात. धार्मिक स्थळी प्रवासाचे योग आहेत. 


शुभ दिवस : 29, 31


कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांचं नशिबत तुम्हाला या आठवड्यात साथ देणार आहे. थोडी मेहनत केल्यास प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. हा आठवडा खर्चिक असणार आहे. बजेटकडे लक्ष द्या. प्रवासातून सकारात्मक परिणाम दिसणार आहे. काही गोष्टींबद्दल काळजी घ्या. 


शुभ दिवस: 28, 30


तूळ (Libra)


या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश घेऊन आला आहे. आर्थिक बाबतही हा आठवड्या चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आरोग्याबाबतही सकारात्मक परिणाम दिसणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी मनात चिंता असणार आहे. 


शुभ दिवस: 29, 30


वृश्चिक (Scorpio)


या आठवड्यात या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. या आठवडय़ात काही बाबतीत तुम्हाला पैशाची वाढणार आहे. तुमच्या कामावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या आठवड्यातील प्रवास पुढे ढकलणे योग्य ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे अस्वस्थ असाल. 


शुभ दिवस : 29,31 


धनु (Sagittarius)


या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रवासातून फायदा होणार आहे. एखाद्या महिलेची मदत तुम्हाला होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे. त्यामुळे तुमचं मनं अस्वस्थ असणार आहे. हा आठवडा उत्पन्नापेक्षा जास्त खर्चिक ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. 


शुभ दिवस: 28, 30, 1


मकर (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला ठरणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमची संपत्ती वाढवणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त मेहनत कराल तितके यश तुमच्या पदरात पडणार आहे. या आठवड्यात प्रवासातही सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. 


शुभ दिवस: 28, 29, 31


कुंभ (Aquarius) 


या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. एखाद्या प्रकल्पाबद्दल विचारपूर्वक आणि संशोधन करुन घेतलेला निर्णय तुमच्या हिताचा ठरणार आहे. या आठवडा खर्चिक ठरणार आहे. मात्र आर्थिक बाबतीत धनयोगाचे संकेतदेखील आहेत. प्रवासातून आनंदायी बातमी मिळणार आहे. 


शुभ दिवस: 28, 29, 31


मीन (Pisces)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभदायक ठरणार आहे. धनलाभाचे योग तुमच्या नशिबात आहेत. गुंतवणूक करताना लक्षपूर्वक करा त्यातून तुम्हाला लाभ होईल. या आठवड्यातील प्रवास पुढे ढकला. कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमचं मन दुषित करणार आहे. 


शुभ दिवस : 29,1


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)