मुंबई : फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्याचे अंकशास्त्र कसे असेल हे आता पाहणार आहोत. आजचा मूलांक चांगला असलेल्या लोकांना खूप लाभ होणार आहे. मूलांक १ ते मूलांक ९ पर्यंत असलेल्या व्यक्तींचे या आठवड्यातील म्हणजे २० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंतचे अंकशास्त्राचे भविष्य पाहणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूलांक १ : या आठवड्यात अचानक येणाऱ्या संकटामुळे थोडी धावपळ होईल. मात्र यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात शांत राहा. सल्ले ऐकून घ्या. चिंतन करा. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. 


शुभं रंग : सफेद   शुभ अंक : ७


मूलांक २ : मनात काही ना काही येत असेल. मनाचे लाड करा. प्रेमाची आवश्यकता आहे. आपली आवश्यकता समजा आणि त्यापद्धतीने वागा. 


शुभ रंग : खारी    शुभ अंक : ५


मूलांक ३ : धर्माबाबत मनात विचार येत राहतील. त्याकडे दुर्लक्ष करा. खांद्याला दुखापत होईल. सावधान राहा. सोमवारी तांदळाचा जेवणात समावेश करा. (Horoscope 20 February 2022 : 'या' तीन राशीच्या लोकांनी वादापासून राहा दूर, रविवारी होणार मोठं नुकसान)


शुभ रंग: केशरी शुभ अंक : ५


मूलांक ४ : हा आठवडा कामात व्यस्त राहण्याचा आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवसभरातून एकदा लेमन ट्री घ्या. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. गणपतीची आराधना करा. 


शुभ रंग : निळा रंग शुभ अंक : १ 


मूलांक ५ : या आठवड्यात आनंदी राहाल. बाहेर जाण्याची गरज नाही आनंद तुमच्यातच आहे. धनलाभ होणार. 


शुभ रंग : सफेद     शुभ अंक : ९ 


मूलांक ६ : या आठवड्यात वाद वाढू शकतात. हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर मंगळवार आणि शुक्रवारी सामान्य जेवणाचा प्रयत्न करा. 


शुभ रंग : वांगी रंग, शुभ अंक : ३


मूलांक ७ : सासरच्या मंडळींकडून शुभ समाचार कानी पडेल. संततीचा विचार करा. मन प्रसन्न राहील. 


शुभ रंग : गुलाबी   शुभ रंग : २ 


मूलांक ८ : हा आठवडा कुटुंबासाठी ठरेल खास. कार्यक्षेत्रात वेळ चांगली जाईल. धन लाभ होईल. आठवडा महत्वाचा आहे. 


शुभ रंग : पिवळा  शुभ अंक : ५ 


मूलांक ९ : टेक्नीकल गोष्टी करताना सावध राहा. तुमची कोणतीच चूक दुर्लक्षित करू नका. घरातील महिलांबाबत थोडं चिंतेच वातावरण असेल. 


शुभ रंग : लाल   शुभ अंक : १