Weekly Tarot Horoscope Prediction 30 september to 6 october 2024 in Marathi : ऑक्टोबरचा पहिला आठवड्यात त्रिग्रह योग निर्माण होतोय. सर्वपित्री अमावस्या, सूर्यग्रहण आणि नवरात्रीचा या आठवड्यात कन्या राशीमध्ये बुध, सूर्य आणि चंद्र हे तिन्ही ग्रह एकत्र प्रवेश करणार आहे. या संयोगामुळे व्यक्तीला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळणार असून प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात 12 राशींसाठी कसा असेल ऑक्टोबरचा पहिला आठवडा टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries Zodiac)   


टॅरो कार्ड्सच्या गणनेनुसार या राशीचे लोक व्यावहारिक आणि प्रतिष्ठित लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. तसंच, या आठवड्यात तुम्ही खूप भावूक होऊ शकता. खूप भावनिक होणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर हा आठवडा तुमच्यासाठी रोमँटिक आणि प्रेमाने भरलेला असणार आहे. आठवड्याचा शेवटचा भाग कौटुंबिक सुरक्षितता आणि काळजीत जाणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा थोडा अस्थिर असणार आहे. या आठवड्यात तुम्ही सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज आहे. तसंच या आठवड्यात प्रवास टाळा. तुम्हाला सट्टेबाजीकडे लक्ष देऊ नका आणि धोकादायक कृती करू नका असा सल्ला दिला जातो. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे सोमवारी दूर होणार असून त्याचे परिणाम तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सौम्य आणि ज्ञानाने भरलेला असणार आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन यश आणि प्रगती मिळेल. तुमची सर्व प्रलंबित कामे या आठवड्यात पूर्ण होतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होणरा आहे. या आठवड्यात तुमच्या जुन्या सवयी चालू ठेवू नका.


कर्क (Cancer Zodiac)   


ऑक्टोबरचा पहिला आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या आठवडय़ात विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल आणि साहित्य आणि संगीतात त्यांची आवड वाढेल. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागू शकतो. इतरांसाठी उपलब्ध व्हा.


सिंह (Leo Zodiac) 


 ऑक्टोबरचा पहिला आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. नवीन खरेदीसाठीही वेळ अनुकूल आहे, व्यापारी नवीन लाभदायक संबंध निर्माण करतील या आठवड्यात नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनीही आरामात काम करावे.


कन्या (Virgo Zodiac)  


कन्या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा फारसा अनुकूल नाही. या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक जीवनात काही समस्या निर्माण होणार आहेत. या आठवड्यात तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विखुरलेल्या गोष्टींची पुनर्रचना करण्यासाठी ऊर्जा गुंतवली पाहिजे.  


तूळ (Libra Zodiac)  


तूळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा काहीसा आंबट आणि काहीसा गोड असणार आहे, असे टॅरो कार्ड्सचे गणित दाखवत आहे. विद्यार्थ्यांना या आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल. या आठवड्याच्या मध्यात म्हणजे गुरुवारी, नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. त्यामुळे जरा संयमाने काम करा.


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची गरज आहे. या आठवड्यात तुम्ही खूप मेहनत करणार आहात. मात्र तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही. पण, तुमच्या मित्रांच्या अनुभवातून तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे.


धनु (Sagittarius Zodiac) 


धनु राशीचे लोक या आठवड्यात काम आणि आरोग्य या दोन्हीकडे लक्ष केंद्रित करणार आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे. पैशाचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आपण त्याच्याबद्दल विचार करत नाही असे त्याला कधीही वाटू देऊ नका.


मकर (Capricorn Zodiac) 


मकर राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात थोडे हुशारीने काम करावे लागणार आहे. या आठवड्यात देवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती आणि लाभाच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. तुम्ही विजयाच्या शोधात पुढे जात आहात असे तुम्हाला वाटेल. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात अधिक रस असणार आहे.  


कुंभ (Aquarius Zodiac) 


कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा खूप छान असणार आहे. या आठवड्यात जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. तुम्ही सध्या जे काही करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, त्याला तुमची गरज भासू शकते.


मीन (Pisces Zodiac)


मीन राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विशेष हेडलाइन मिळताना दिसून येत आहे. या आठवड्यात तुम्हाला खूप आराम वाटेल. भूतकाळात तुम्हाला ज्या समस्या येत होत्या त्या दूर होतील. नोकरदार लोक त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे समाधानी राहतील. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)