Weekly Tarot Horoscope Prediction 11 To 17 march 2024 in Marathi : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य मीन राशीत प्रवेश केल्यामुळे मीन राशीत सूर्य आणि राहूचं संयोग होणार आहे. सूर्य राहूच्या संयोगातून ग्रहण योग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत टॅरो राशीनुसार, मार्चचा हा आठवडा काही राशींसाठी आनंदाचा, आर्थिक लाभाचा ठरणार आहे. तर काही राशींसाठी थोडा काळजी करणारा आहे. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी आठवडा कसा असेल ते सविस्तर जाणून घ्या. (Weekly Tarot Horoscope Prediction Tarot Card Reading For 11 To 17 march 2024 Saptahik Rashi Bhavishya in Marathi)


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असणार आहे, असं टॅरो कार्ड्सचे गणित दाखवत आहे. समस्या टाळण्यासाठी या आठवड्यात लोक तुमच्याकडून मदत आणि सल्ला घेणार आहेत. धार्मिक आणि अध्यात्मात रुची वाढणार आहे. भाऊ, बहीण, नातेवाईक यांच्याशी विचारांच्या समन्वयाचा अभाव असणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


टॅरो कार्ड्सची गणना दर्शवित आहे की, या राशीच्या लोकांसाठी व्यवसायात नवीन योजना लागू करणार आहेत. प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे. हा आठवडा मनोरंजनाने भरलेला असणार आहे. तुम्ही मौजमजा आणि खेळ इत्यादी कार्यात व्यस्त असणार आहात. कामासाठी वेळ समाधानकारक असणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांनी या आठवड्यात थोडे सावध राहण्याची गरज असल्याचे टॅरो कार्ड्सचे गणित दाखवत आहे. तुमच्या जवळचा कोणीतरी तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. मित्रांना भेटताना काळजी घ्यावी लागणार आहे. कोणालाही पैसे उधार म्हणून देऊ नका. दीर्घकाळ चाललेले प्रेमसंबंध लग्नापर्यंत जाणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


कर्क (Cancer Zodiac)   


कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार असल्याचे टॅरो कार्ड्सचे गणित दर्शवत आहे. नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात येऊ नका. त्यामुळे विनाकारण गोंधळ जाऊ नका. कोणताही वाद सोडवायला जाऊ नका. 


सिंह (Leo Zodiac) 


टॅरो कार्ड्सची गणना दर्शविते की सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या सभोवतालच्या लोकांशी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचं सहकारी तुमच्या प्रगतीचा हेवा करणार आहे. तुमच्या कामात अडथळे निर्माण होणार आहे. तुम्ही या काळात सावधगिरी बाळगा. स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)    


कन्या राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आठवडा थोडा कमकुवत असणार आहे. अनियमिततेमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. हा तुमच्यासाठी कसोटीचा काळ असणार आहे. त्यामुळे तुम्ही सतत सतर्क राहणे गरजेचे आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. 


तूळ (Libra Zodiac)  


टॅरो कार्ड्सची गणनेनुसार तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सौम्य आणि ज्ञानाने परिपूर्ण असणार आहे. तुम्ही इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. व्यवसायात नवीन यश आणि प्रगती तुम्हाला मिळते. प्रेमसंबंध मधुर होणार आहे. तुम्हाला एक छान भेट देखील मिळणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गुंतागुंतीपासून मुक्त होण्याचा ठरणार आहे. या आठवड्यात मानसिक गोंधळापासून आराम मिळणार आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सहकाऱ्यांशी समन्वय राखवून ठेवण्यात यश मिळणार आहे. सोमवारी तुम्हाला तुमच्या अनुभवातून माहिती मिळणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप आनंदाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रेम व्यक्त करण्यात घाई करु नका. हे शक्य आहे की तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता ते फक्त आकर्षण असू शकता. आर्थिक स्थिती समाधानकारक राहावं लागणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)  


टॅरो कार्ड्सची गणनेनुसार या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसाठी प्रत्येक स्तरावर समायोजन करणे गरजेचे आहे. तुम्हाला सल्ला दिला जातो की धीर धरणे फार महत्वाचे असणार आहे. पदोन्नतीची संधी मिळणार आहे. या काळात तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तुमच्या बाजूने वापरणार आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


या आठवड्यात कुंभ राशीचे लोक आक्रमक स्वभावाचे असणार आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल थोडेसे वाईट वाटणार आहे. नंतर काही विशेष वाटणार नाही. फालतू खर्च करु नका. तुमच्या जोडीदाराशी मतभेद होणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक करणे तुमच्या हिताच होणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)  


टॅरो कार्डच्या गणनेनुसार मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. व्यवसायात नवीन योजना राबवणार आहात. प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे. आठवडा मनोरंजनाने भरलेला असणार आहे. तुम्ही मौजमजा आणि खेळ इत्यादी कार्यात व्यस्त असणार आहात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्ड शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)