Weekly Tarot Horoscope Prediction 17 to 23 June 2024 in Marathi : टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार हा आठवडा अतिशय खास आहे. मिथुन राशीत बुध, शुक्र आणि सूर्याची भेट त्रिग्रही योग तयार होणार आहे. अशा स्थितीत चार राशींसाठी हा योग लॉटरी ठरणार आहे. चला तर मग हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणार आहे पण तो तुमच्यावर वर्चस्व गाजवण्यात अपयशी ठरणार आहे. महत्त्वाच्या योजनांमध्ये विलंब आणि अपयशामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


टॅरो कार्ड्सची गणना दर्शविते की वृषभ राशीच्या लोकांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा व्यावहारिक बनवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्य आणि पैशाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मात्र, या आठवड्यात तुमची कामे पूर्ण होण्यास विलंब झाल्याचे जाणवेल. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करणे शहाणपणाचे आहे.


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा करणे टाळा. त्यामुळे कटुतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. शिवाय आठवड्याच्या मध्यात थोडी सुधारणा होईल आणि तुम्हाला बरं वाटेल.


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांना थोडेसे वाईट असा हा आठवडा असणार आहे. तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांकडून टीका आणि विरोधाचा सामना करावा लागणार आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. करार अंतिम करताना तुमचा संयम डगमळू देऊ नका. 


सिंह (Leo Zodiac) 


या राशीच्या लोकांचे कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या नातेसंबंधात त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. या स्थितीमुळे तुमचा स्वभाव रागीट आणि चिडचिड होणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. इतरांच्या समस्यांमध्ये अडकल्याने नुकसान होण्याची भीती आहे. 


कन्या (Virgo Zodiac)    


या राशीच्या लोकांना या आठवड्यात नफा मिळण्याची शक्यता असून आर्थिक व्यवहारात तुम्ही जोखिम घेऊ शकता. शिवाय या आठवड्यात तुम्ही आपल्या ध्येयाबद्दल पुरेसे गंभीर नसणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. कौटुंबिक जीवन सुसंवादी असणार आहे. 


तूळ (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रसिद्धी मिळणार आहे. तसंच या आठवड्यात तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी राहणार आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात वेळ घालवणार आहात. ज्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह वाटणार आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


या राशीच्या लोकांच्या स्वभावात या आठवड्यात आक्रमकता असणार आहे. एवढंच नाही तर या आठवड्यात तुम्हाला काही कारणाने थोडे उदास वाटणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी काही विशेष असेल असे दिसत नाही. तुम्हाला अनावश्यक खर्च या आठवड्यात टाळावा लागणार आहे. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक असू द्या. 


धनु (Sagittarius Zodiac) 


या राशीचे लोक या आठवड्यात विरुद्ध लिंगाचे सहकारी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधींमध्ये यश मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा.


मकर (Capricorn Zodiac)   


या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व या आठवड्यात थोडे कमजोर असणार आहे. जनसंपर्क करण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे. शिवाय या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होणार आहे. पण, तुम्हाला घाबरण्याची गरज नसणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कोणतेही काम करताना शॉर्टकटचा अवलंब करु नका. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


या राशीचे लोक या आठवड्यात नवीन कामांमध्ये खूप व्यस्त असणार आहे. तुमची आर्थिक बाजू खूप चांगली राहणार आहे. एखाद्या नातेवाईकाच्या किंवा स्वत:च्या आजारामुळे तुम्ही त्रस्त असणार आहात. राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात अनेक संधी तुमची वाट पाहावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष लाभ आणि नवीन संधी मिळणार आहे. प्रियजनांच्या संपर्कात असणार आहात. कौटुंबिक जीवनात आनंद आणि जवळीक वाढणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)