Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?
Khandoba Navratri 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजे 13 डिसेंबरला खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. सोमवारी 18 डिसेंबरला चंपाषष्ठी असते. यालाच खंडोबा नवरात्र असंही म्हणतात.
Champa Shashti 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! मार्गशीर्ष महिन्यात (Margashirsha 2023) प्रतिपदा तिथीपासून खंडोबा षडरात्र उत्सवाचा (khandoba shadratra utsav) प्रारंभ होणार आहे. यंदा बुधवारी 13 डिसेंबर 2023 ला जेजुरी गडावर खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होईल. या उत्सवाला मार्तंडभैरव षड्रात्रोत्व, खंडोबा नवरात्र (Khandoba Navratri 2023 ) असंही म्हटलं जातं. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. यंदा चंपाषष्ठी (Champa Shashti 2023 ) 18 डिसेंबर सोमवारी असणार आहे. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केलं होतं. म्हणून हा मल्हारी मार्तंड भैरवाचा षड्ररात्रोत्सव हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. (What is Khandoba Shadratra festival How to perform Khandoba Navratri Ghatasthapana 13 December 2023 Margashirsha 2023)
खंडोबा षडरात्र उत्सव किंवा खंडोबा नवरात्री
साधारण 9 दिवसांचं नवरात्र असतो जे देवीच्या पूजेसाठी केलं जातं. पण खंडोबा नवरात्र हे 6 दिवसांचं असतं. ज्याचे कुलदैवत खंडोबा असतं त्यांच्या घरात नवरात्रीत घटस्थापना केली जाते. खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी, पंचमीला काय करावं आणि चंपाषष्ठीला काय करावं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी?
घरातील मुला मुलींचे लग्न जुळण्यासाठी, आर्थिक समस्या आणि करिअर यासारख्या अनेक समस्या दूर होण्याठी कुलदैवतीची कृपा असणे गरजेचं आहे. कुलधर्म, कुलाचार हा केलाच पाहिजे. घटस्थापना आपल्या घरी होत नसेल तरी आपल्या सर्वांचं कुलदैवत भगवान शंकर आहे. तर खंडोबा हे भगवान शंकराचं रुप आहे. म्हणूनच या नवरात्रीत खंडोबाचं मंत्र, ग्रंथ वाचन आणि पूजा नक्की करा.
13 डिसेंबरला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावं. देवघरातील सर्व देवांना स्नान अभिषेक करुन पूजा करावी. त्यानंतर देवघराजवळची जागा स्वच्छ करावी. ज्याठिकाणी तुम्हाला घटस्थापना करायची आहे. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्या. एक चौरंग घ्यावा त्यावर पिवळे वस्त्र घालावं. आता त्यावर श्री स्वामी समर्थ यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. जर तुमच्याकडे खंडोबाचा फोटो असेल तर तो नक्की ठेवा. चौरंगाभोवती रांगोळी काढावा. घटस्थापनची सुरुवात दिपपूजाने करा. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा.
दिपपूजन झाल्यानंतर आचमन करायचं. पूजेपूर्वी शुध्दीकरणासाठी नामजपासह शुद्ध पाणी ग्रहण आचमन केलं जातं. भगवान विष्णूच्या 24 नावाचं उच्चार करा. उजव्या हातात थोड पाणी घ्या, एखाद फुलं, हळद, कुंकू, अक्षदा आणि आता मनोमन खंडोबांचं स्मरण करुन कुलदेवीला संपूर्ण कुटुंबासाठी संकल्प करावा.
आता विघ्नहर्ता गणरायची पूजा करावी. त्यासाठी बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्या. आता घटस्थापना करुन कलशाची पूजा करावी. त्यानंतर तुमच्या देवघरातील खंडोबाचा टाकाला घ्यावं. तांबण्यामध्ये त्याचा अभिषेक करुन चौरंगावर विड्याचा पानावर स्वस्तिक काढून त्यावर टाकाला ठेवावं. खंडोबा महाराजांना हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भंडारा नक्की वाहवा. पूजा झाल्यावर पहिल्या दिवशी घटावर विड्याच्या पानाची माळ बांधावी.
खंडोबा मंत्र
ॐ श्री खंङेराया मार्तंङ भैरवाय नमः
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)