Shani Amavasya 2023: शनिदेव कुंभ राशीत राशीत विराजमान झाल्यानंतर राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. काही राशींची साडेसाती, अडीचकीतून मुक्तता होणार आहे. तर काही राशी शनिच्या प्रभावाखाली येणार आहेत. शनिदेव मंदगतीने गोचर करतात आणि एका राशीत अडीच वर्षे ठाण मांडतात. त्यामुळे ज्या राशीला शनिदेव येणार आहेत, त्यांना चांगलाच घाम फुटतो. शनिदेवांचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेशामुळे धनु राशीची साडेसाती आणि मिथुन-तूळ राशीची अडीचकी संपणार आहे. दुसरीकडे मकर-कुंभ या राशींसोबत मीन राशीला साडेसाती सुरु होणार आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या प्रभावाखाली येणार आहेत. त्यामुळे या राशींची चिंता वाढली आहे. असताना शनिदेवांचा गोचर आणि एक विशेष योग जुळून आला आहे. पौष महिन्यातील अमावास्या शनिवारी आल्याने ज्योतिषशास्त्रातील काही उपाय केल्यास शनिदेवांना प्रसन्न करता येईल. यावर्षी 21 जानेवारीला मौनी अमावस्या आहे. तसेच या दिवशी शनिवार असल्याने शनैश्चरी अमावस्या म्हंटलं जातं. 


मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनी अमावस्या 21 जानेवारीला सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सुरु होईल आणि 22 जानेवारीला सकाळी 2 वाजून 22 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार मौनी अमावास्या 21 जानेवारीला साजरी केली जाईल.  या दिवशी शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत असलेल्या कुंभेत असणार आहे. या दिवसी खप्पर योग, चर्तुग्रही योग, षडाष्टक योग आणि समसप्तक योग असणार आहे. त्यामुळे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस चांगला ठरेल.


शनि अमावस्येला काय कराल?


शनिवारी शनिंच्या प्रिय वस्तूंचं दान करावं. गोंधडी, काळे चप्पल, काळे तीळ, काळी उडद या वस्तूंचं दान करावा. ज्योतिषशास्त्रानुसार, मोहरीच्या तेलाने शनिदेवांचा अभिषेक करावा. तसेच शनि मंदिरात जाऊन दशरथकृत शनि स्तोत्राचं पठण करावं. 


बातमी वाचा- Chanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...


शनिदेवांची पुढची स्थिती कशी असणार?


शनिदेव राशीत आल्यानंतर बऱ्याच घडामोडी वेगाने घडतात. 17 जानेवारीनंतर शनिदेव आपला प्रभाव दाखवतीलच. पण दरम्यान 5 फेब्रुवारी 2023 रोजी शनिदेव सूर्याजवळ येणार असल्याने अस्ताला जातील. या स्थितीत ते 32 दिवस असणार आहेत. 9 मार्च 2023 रोजी शनिदेवांना पुन्हा तेज प्राप्त होईल. अस्त काळात संकटांचा प्रभाव कमी होईल. पण त्यानंतर पुन्हा एकदा अनुभव येतील, असं ज्योतिषशास्त्रांचं म्हणणं आहे. शनिदेव 17 जून 2023 रोजी शनि पुन्हा एकदा कुंभ राशीत वक्री होणार आहे. या स्थितीत शनिदेव 140 दिवस असणार आहेत. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 रोजी मार्गस्थ होणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)