How To Keep Gangajal At Home: हिंदू धर्मात गंगा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद-पुराणात म्हटल्यानुसार गंगा नदीत डुबकी लगावल्यास मनुष्याचे सारे पाप नष्ट होतात. याच मान्यतेनुसार देशभरातील भाविकांची आयुष्यातून एकदा तरी गंगा नदीत स्नान करण्याची इच्छा असते. गंगेइतक धार्मिक महत्त्व जगातील इतर कोणत्या नदीला नसेल. अनेक धार्मिक ग्रंथात गंगा नदीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. गंगा नदी इतकंच भारतीय संस्कृतीत गंगाजलासही महत्त्व आहे. धार्मिक विधीसाठी तर गंगाजलाचा मोठ्या प्रमाणात वापर होते. इतकंच, नव्हे तर आपल्या घरातील देवघरातही गंगाजल असते. घर शुद्ध करण्यासाठी गंगा जलाचा वापर केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वांत मोठी आणि सर्वांत पवित्र म्हणून गंगा नदीची ओळख जगभरात आहे, गंगा नदीचे पाणी शुद्ध आणि पवित्र, पावन असल्याची मान्यता आहे. गंगेची एकूण लांबी २, ५२० किमी असून तिचे जलवाहन क्षेत्र सुमारे ८,३८,२०० चौ . कि.मी. म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा सुमारे चौथा हिस्सा इतके आहे. गंगानदीला माता म्हणूनही संबोधले जाते. 


घरात गंगाजल ठेवायच्यादेखील काही नियम आहेत. तुम्ही देखील घराच्या देव्हाऱ्यात गंगाजल ठेवत असाल तर हे नियम माहिती करुन घेणं गरजेचं आहे. गंगाजल घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते व घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते. मात्र, गंगाजल योग्य ठिकाणी किंवा शास्त्रानुसार ठेवलं नाही तर अशुभ लक्षणही मानले जाते. त्यामुळं जाणून घेऊयात गंगाजल घरात ठेवण्याचे नियम. 


पतीचे करोना काळात निधन, दोन वर्षांनी पत्नीने कबर खोदून काढले अवशेष, कारण... 


गंगाजल घरात ठेवण्याचे नियम 


गंगाजल घरात ठेवण्याची जागा एकदम साफ हवी. त्याच्या आजूबाजूला कोणतीही अशुद्ध गोष्ट ठेवू नका. गंगाजल घरात ठेवत असाल तर ते शक्यतो देव्हाऱ्यातच ठेवा व त्याची रोज सफाई होईल, याची काळजी घ्या


गंगाजल पवित्र असते त्यामुळं ते नेहमी शुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यातच ठेवावे. गंगाजल ठेवण्यासाठी तांबे किंवा चांदीचे भांडे सर्वश्रेष्ठ आहे. गंगाजल कधीच प्लास्टिकच्या बॉटेलमध्ये ठेवू नका. हल्ली बाजारात सर्रास प्लास्टिकमध्ये येणारे गंगाजल विकले जाते. मात्र, शास्त्रानुसार, गंगाजल ठेवण्यासाठी शुद्ध धातूचे भांडे हवे. 


गंगाजलला कधीच खराब हाताने किंवा खराब वस्त्र परिधान करुन हात लावू नका. नेहमी हात स्वच्छ धुवूनच गंगाजलला स्पर्श करा. 


जर तुम्ही गंगाजलचा उपयोग करत असाल तर नेहमी गंगामातेचं स्मरण आवश्य करा. विशेषतः स्नानकरताना जर गंगाजल वापरत असाल तर गंगामातेचं ध्यान जरुर करा.


गंगाजल नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे, अशी मान्यता आहे. फक्त गंगाजलच नाही तर इतर पवित्र नद्यांचे पाणीदेखील ईशान्य दिशेला ठेवावे.