Holi 2024 : हिंदू धर्मात सण उत्सालाहा अन्यन साधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सव आणि व्रतामागे धर्म शास्त्रात कारण देण्यात आलंय. भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार. होलिका दहन आणि होळीचा हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होलिका दहन पंचांगानुसार पौर्णिमा तिथीला म्हणजे यंदा येत्या रविवारी 24 मार्च साजरा करण्यात येणार आहे. तर धुलिवंदन किंवा धुरवड म्हणजेच रंगांची उधळण ही सोमवार 25 मार्चला असणार आहे. (Why celebrate Holi and Holika Dahan and Dhulivandan What is the scientific reason behind it)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात प्रत्येक सणामागे काही तरी वैशिष्ट आणि कारण असतं. सोबतच भारतातील या सणांमागे वैज्ञानिक कारणंही असतात. होलिका दहन आणि रंगांचा सण खेळण्यामागेही वैज्ञानिक कारण असल्याचं आधात्मक अभ्यासक परवीन शर्मा यांनी सांगितलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉम इन्स्टाग्रामवरील saiparveensharma या पेजवर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात परवीन शर्मा यांनी होळी सणाचं वैज्ञानिक कारण सांगितलं आहे. 


होलिका दहन का करतात?


परवीन शर्मा सांगतात की, वसंत ऋतुमधील होळी म्हणजे होलिका दहन आणि रंगाची होळी म्हणजेच धुलिवंदन या दोन सणाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार होलिका दहनामागे भक्त प्रल्हादची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण यामागे वैज्ञानिक कारणही आहे. होलिका दहन हे आपल्या आजूबाजूच्या वातावरण शुद्धेसाठी महत्त्वाची आहे. 


हिवाळा आणि वसंत ऋतूचा उत्परिवर्तन काळात वातावरणात तसंच शरीरात जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. अशा स्थितीत जेव्हा आपण होलिका दहन करतो तेव्हा तापमान 145 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत वाढतं. जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा बॅक्टेरियाचे प्रमाण वाढतं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या समस्या वाढतात. या होलिका दहनासाठी आपण शेणाच्या गोवऱ्या आणि होम सामुग्रीचा वापर करतो. यामुळे होलिका दहनातून वातावरणातील जीवाणूंचा नाश होतो. 
परंपरेनुसार जेव्हा आपण अग्नीभोवती प्रदक्षिणा मारतो, तेव्हा अग्नीच्या उष्णतेमुळे शरीरातील जीवाणू नष्ट होतात, त्यामुळे वातावरण आणि आपलं शरीर शुद्ध होतं. 


रंगांची उधळण का केली जाते?


होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगांची होळी खेळतो. पूर्वीच्या काळी हे रंग नैसर्गिक असायचे. ते फळं, फुलं आणि भाज्यांपासून तयार केले जायचे. चंदन, हळद आणि मुलतानी मातीपासून तयार केले  रंग असायचे. जेव्हा हे रंग एकमेकांच्या चेहऱ्यावर लावले जायचे. त्यामुळे आपल्या त्वचेच संरक्षण व्हायचं. 



भारतातील सणाची ही सुंदरता आणि महत्त्वपूर्ण गोष्टी फारच क्वचित लोकांना माहिती आहे. या सणांमागील वैज्ञानिक कारण कळल्यानंतर त्या सणाचा आनंद अजून द्विगुणीत होतो.