Deep Amavasya 2024 : आषाढ अमावस्या, आखाड अमावस्या किंवा दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. याच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या अमावस्येला गतहारी म्हणजेच गटारी अमावस्या असही म्हटलं जातं. श्रावणात एक महिन्यात नॉनव्हेज आणि दारुचं सेवन केलं जात नाही. त्यामुळे रविवार आणि त्यात गटारी अमावस्या अनेक घरांमध्ये चिकन - मटणावर ताव मारला जाणार आहे. पण हिंदू शास्त्रानुसार दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा केली जाते. पण त्यासोबत यादिवशी घरातील लहान मुलांचं औक्षण केलं पाहिजे, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. (why do pray for our children Deep Amavasya 2024 )


....म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश अंधःकार दूर करून सारे काही उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधःकाराला चीरून सर्व संकंट दूर करून मुलांचं आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावं या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केलं जातं.  


हेसुद्धा वाचा - Gatari Amavasya 2024 : श्रावणाच्या आधी मांसाहार प्रेमी का साजरी करतात गटारी? आषाढी अमावस्येचं खरं नाव व अर्थ काय?


काय आहे कथा?


यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी, गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केलं होतं अशी कथा आहे. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली होती. असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवळताना केली होती.  तेव्हापासून ही प्रथा सुरू आजपर्यंत सुरु आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस केली जाते. 


'या' खास दिव्याने असं करा मुलांचं औक्षण!


दीप अमावस्या घरातील लहान मुलांना ओवाळलं जातं. यादिवशी एका खास दिव्याने मुलांचं औक्षण केलं जातं. कणिकेच्या दिव्याने त्यांचं औक्षण केलं जातं. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)