Gatari Amavasya 2024 : श्रावणाच्या आधी मांसाहार प्रेमी का साजरी करतात गटारी? आषाढी अमावस्येचं खरं नाव व अर्थ काय?

Gatari Amavasya 2024 : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. अशात मांसाहार प्रेमींना वेध लागले आहेत ते गटारी अमावस्येचे. यंदा कधी आहे गटारी अमावस्या आणि याचं खरं नाव आणि अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Jul 29, 2024, 03:31 PM IST
Gatari Amavasya 2024 : श्रावणाच्या आधी मांसाहार प्रेमी का साजरी करतात गटारी? आषाढी अमावस्येचं खरं नाव व अर्थ काय? title=
Gatari Amavasya 2024 Why meat lovers celebrate Gatari before Shravana What is the real name and meaning of Ashadhi Amavasya

Gatari Amavasya 2024 : बघाव तिकडे हिरवगार वातावरण, रंगबिरंगी फुलांची त्याला साथ असे नयनरम्य दृश्य मनाला मोहत करणारा श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. आषाढी अमावस्या झाल्यावर श्रावणमासाला सुरुवात होते. पण श्रावण सुरु होण्यापूर्वी मांसाहारी प्रेमींना वेध लागतो तो गटारी अमावस्येचा. गटारी म्हणजे मस्त भरपेट मांसाहार आणि मद्यपान. पण याचा नेमका अर्थ तरी काय आणि याला गटारी अमावस्या असं का म्हणतात. (Gatari Amavasya 2024 Why meat lovers celebrate Gatari before Shravana What is the real name and meaning of Ashadhi Amavasya)

खरं तर श्रावणापूर्वी येणाऱ्या अमावस्येला महाराष्ट्रात आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2024) आणि दीप अमावस्या ( Deep Amavasya 2024) असं म्हटलं जातं. तर गुजरातमध्ये हरियाली अमावस्या ( Hariyali Amavasya 2024) , कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2024) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. 

कधी आहे गटारी अमावस्या?

यंदा दीप अमावस्या म्हणजे गटारी 4 ऑगस्ट रविवारी असणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. दीप अमावस्येला दीपपूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यादिवशी दीप पूजन करुन दान केल्यास मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात. 

गटारी अमावास्या हे नाव कस पडलं ?

खरं तर गटारी असा मुळात शब्द नसून याच खरं नाव गतहारी अमावस्या असा आहे. या शब्दाचा अपभ्रंश करुन त्याला गटारी असं म्हटलं जातंय. 
गतहारी अमावस्या म्हणजे गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहारचा अर्थ होतो गेलेला/त्यागलेला आहार. यावरुन याला गटारी अमावस्या असं नाव पडलंय. 

का साजरी करतात गतहारी अमावस्या? (Gathari Amavasya)

धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान हे वर्ज्य असतं. ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात साधं खाणं पचवणं सुद्धा कठीण होऊन जात असतं. तर मांस-मासे वेगैरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणंच शास्त्रीय दृष्ट्या योग्य असतं. तर धार्मिक कारणानुसार या महिन्यात अनेक व्रक वैकल्ये अगदी गपणपतीसह गौरीच आगमन असतं. त्यामुळे मन शुद्ध असावं म्हणून मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य असतं. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)