Hanuman Jayanti in Marathi : संकटमोचन हनुमान यांची उपासना केल्यास सर्व संकटांपासून मुक्तता मिळते असं भक्तांचा विश्वास आहे. श्रीराम प्रभू यांची जयंती झाल्यानंतर म्हणजे रामनवमीनंतर 6 दिवसांनी हनुमान जयंतीचा उत्साह साजरा करण्यात येतो. अंजनी पुत्र हनुमानजी यांच्या जन्म पृथ्वीवर रामाचा जन्म झाल्यानंतर झाला. हनुमान जयंती ही चैत्र महिन्यातील पौर्णिमेला तिथी साजरी करण्यात येते. रामनवमीच्या 6 दिवसांनीच हनुमान जयंती हा योगायोग नाहीतर शास्त्रानुसार यामागे एक मोठं कारण आहे. (Why is Hanuman Jayanti celebrated 6 days after Ram Navami Hanuman Jayanti 2024 Date significance puja vidhi shubh muhurat in marathi)


हनुमान जयंती कधी आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 ला पहाटे 3:25 वाजेपासून 24 एप्रिल 2024 ला पहाटे 5:18 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार हनुमान जयंतीचा उत्साह 23 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. 


संकटमोचन हनुमानजीची पूजा शुभ मुहूर्त 


23 एप्रिल 2024 ला हनुमानजीची पूजा ही पहाटे 3:25 ते 5:18 तुम्ही करु शकता. धर्मशास्त्रानुसार दिवसभर शुभ असल्याने तुम्ही पूजा करु शकता. त्यात सर्वात महत्त्वाच म्हणजे हिंदू धर्मात प्रत्येक देवाची पूजा करण्यासाठी वार देण्यात आला आहे. मंगळवार आणि शनिवार हा हनुमानची पूजा करण्यासाठी दिवस आहे. त्यामुळे हनुमान जयंती मंगळवारी आल्यामुळे हा सर्वात शुभ योगायोग आहे. 


हनुमान जयंती पूजा विधी!


हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमानाचे पाच वेळा नामस्मरण करु स्नान करा. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करुन हनुमानजींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर  'ओम केशवाय नमः, ओम नरणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम हृषिकेशाय नमः' या मंत्राचा जप करा. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर हनुमान चालीसा, सुंदरकांड पाठ करा. आता हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण करा. 


रामनवमीच्या 6 दिवसांनी हनुमान जयंती का असते?


दरवर्षी रामनवमी चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी आणि हनुमान जयंती पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्यात येते. यावर्षी 17 एप्रिलला रामनवमी साजरी करण्यात आली आणि आता 23 एप्रिलला हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी रामनवमीच्या सहा दिवसांनी हनुमान जयंती साजरी करण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यशिवाय तुलसीदासांनी हनुमान चालीसामध्ये लिहिलंय की, भीमच्या रूपाने त्यांनी राक्षसांचा नाश केला आणि रामचंद्रजी बिघडलेली कामं मार्गी लावतात तर हनुमानजी त्यांचे सर्व कामे करतात. राम हे विष्णूचा अवतार आहे आणि हनुमान हा शिवाचा 11वा अवतार मानला जातो. 


त्रेतायुगात देवाचा जन्म पृथ्वीवर झाला. अशी मान्यता आहे की, भगवान श्रीरामांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला होता. मात्र भगवान शिव पृथ्वीवर आल्यावर थोडे चिंताग्रस्त झाले होते. यानंतर, रामजींना मदत करण्यासाठी त्यांनी स्वतः श्री रामचंद्रांच्या सहा दिवसांनंतर 11 व्या रुद्रावतारात हनुमानजी म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. जेव्हा प्रभू श्री राम सर्वांना राक्षसांपासून मुक्त करत होते, तेव्हा हनुमानजी मागे उभे राहून त्यांचे सर्व कार्य करत होते. अशी आख्यायिका आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)