Laughing Buddha: आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो तेव्हा आपल्याला लाफिंग बुद्धाची (Laughing Buddha) मूर्ती पाहायला मिळते. फेंगशुई (Fengshui) वास्तुशास्त्रात लाफिंग बुद्धाला विशेष स्थान आहे. लाफिंग बुद्ध घरात ठेवणे शुभ मानले जाते. चिनी वास्तुशास्त्रानुसार (architecture) लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने केवळ शुभच नाही होत तर आर्थिक लाभाचीही शक्यता निर्माण होते. (Why is Laughing Buddha's idol kept in homes and how is it related to Vaastu Know details here nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेंगशुई वास्तुशास्त्रात लाफिंग बुद्धाला जितके भाग्यवान म्हटले आहे, तितकेच इतिहासात लाफिंग बुद्धाविषयी (History Laughing Buddha) अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. आज आपण लाफिंग बुद्ध कोण होते (Who was the Laughing Buddha?), त्यांची मूर्ती घरांमध्ये का ठेवली जाते (Why are their idols kept in houses?) आणि तिचा वास्तुशी कसा संबंध आहे (How is it related to Vastu?) या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे पाहणार आहोत.


 


लाफिंग बुद्ध कोण होता? (Who was Laughing Buddha) 


लाफिंग बुद्धाच्या पुतळ्याकडे पाहिल्यास हे दिसून येते की हे एक संत किंवा एक झेन भिक्षू आहे ज्याचा इतिहास 1000 वर्षांचा आहे. लाफिंग बुद्धा यांना त्यांच्या होतेई या नावाने ओळखले जात होते, त्यांचे हे नाव भारताबाहेर जास्त लोकप्रिय आहे. पण नंतर त्याच्या उदार स्वभावामुळे, पोटाला फुगवलेले आणि प्रत्येक क्षणी ओठांवर हास्य यामुळे त्यांना लाफिंग बुद्ध हे नाव देण्यात आले. लाफिंग बुद्धाची अनेक मंदिरे आहेत जी चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये स्थापित आहेत.


 


लाफिंग बुद्धाचा वास्तूशी कसा संबंध आहे? (How Laughing Buddha is related to Vastu)


लाफिंग बुद्धाशी संबंधित काही रंजक दंतकथा आहेत, ज्यानुसार पहिल्यांदा लाफिंग बुद्ध (Vastu Tips related to Laughing Buddha) एका गरीब व्यक्तीला पाहून खूप निराश झाले. लाफिंग बुद्धाच्या चेहर्‍यावर हास्याऐवजी दु:ख पहिल्यांदाच सर्वांनी पाहिल्याची ही घटना होती.


त्याचा निराश चेहरा पाहून काही मुलं त्याच्या पोटावर गुदगुल्या करू लागल्या, त्यानंतर ते हसायला लागले. पहिल्या निराशेनंतर लाफिंग बुद्धाच्या चेहऱ्यावर हास्य अशा प्रकारे पसरले की लोकांच्या घरात पैशांचा पाऊस पडू लागला.


या घटनेमागील तर्क असा आहे की लाफिंग बुद्ध हे दैवी संत होते, म्हणूनच त्यांचे हसणे पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी आशीर्वाद म्हणून लोकांच्या घरी संपत्तीचा वर्षाव केला.


पैशांचा पाऊस पडण्याच्या घटनेपासून या आख्यायिकेला जोर आला आहे की, लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्यास केवळ पैसाच नाही तर घरात सकारात्मक वातावरण ही निर्माण होते आणि मग असे असल्याने लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात महत्त्वाची मानली जाते. 


 


लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात का ठेवली जाते? (Why Laughing Buddha Keep at Home)


1. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत.
2. लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्याने वास्तुदोष आपोआप दूर होतात असे म्हणतात.
3. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
4. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मकता नष्ट होते.
5. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने जीवनात यश मिळते.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)