Gudi Padwa 2024 :  हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याचा सण. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी विजयाची गुढी उभारण्यात येते. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरु होतं तर मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिला सण अतिशय शुभ मानला जातो. ढोल ताशांच्या मिरवणुका, मराठमोळ्या थाट, रांगोळी, गोडाधोडाचा नैवेद्य आणि घरीघरी विजयाची गुढी असा महाराष्ट्रात मोठा जल्लोष असतो. असा हा गुढीपाडव्याचा सण कधी आहे. शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या. (Why is the festival of Gudipadwa so special Know Tithi pooja method and auspicious time with interesting facts)


गुढीपाडव्या तिथी !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 ला रात्री 11.50 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 ला रात्री 8.30 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी 9 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. 


गुढीपाडवा शुभ मुहूर्त !


गुढी उभारण्यासाठी यंदा शुभ मुहूर्त हा मंगळवारी 9 एप्रिला सकाळी 06.02  वाजेपासून 10.17 असणार आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकणार आहात. 


गुढीपाडव्याचा अर्थ काय?


गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा असं संबोधलं जातं. गुढी पाडवा हा सण रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. 


गुढीपाडवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध


महाराष्ट्रात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. यादिवशी महाराष्ट्रात विजयाचे ध्वज घराबाहेर फडकवतात. गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. 


गुढीपाडव्याची आख्यायिका


गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील एक आख्यायिका अशी आहे की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली. या काठीची त्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला पूजा केली. ही परंपरा आजही पुढे चालवण्यात येतं आहे. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परले म्हणून गुढीपाडव्या उत्साह साजरा करण्यात येतो. अशीच अजून एक आख्यायिका आहे ज्यात म्हटलं गेलं आहे की, पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्याला ठरलं. त्यानंतर तृतीये तिथीला पार्वती शंकराचं लग्न झालं असं म्हणतात. तर या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा करण्यात येते. 


गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Significance)


वैदशास्त्रात असाही उल्लेख आहे की, सत्ययुगाची सुरुवातही याच तिथीला करण्यात आली होती. तर या तिथीला महान ज्योतिषी आणि गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून पंचांगाची रचना केली. गुढीपाडव्या पहिला दिवस हा चंद्राची पहिली अवस्था मानली गेली आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)