गुरुवारी पिवळ्या रंगाचं महत्त्व का आहे? या वस्तूंचं दान केल्यास मिळतो लाभ, जाणून घ्या
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवस सर्व देवी-देवतांना समर्पित असतो. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती देव यांना समर्पित आहेत.
Astrology Of Thursday And Vishnu: हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवस सर्व देवी-देवतांना समर्पित असतो. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती देव यांना समर्पित आहेत. या दिवशी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा करताना पिवळे कपडे परिधान करणं शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर केल्याने फायदे होतात. या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणेही लाभदायक असल्याचे सांगितले जाते.
गुरुवारी या वस्तूंचे दान करा
-गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूला केळी आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. गरिबांमध्ये प्रसाद वाटप करा. असे केल्याने नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि भगवान विष्णूची कृपा राहते.
-या दिवशी गरीबांना पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने सर्व कार्य विना अडथळा पूर्ण होतात.
-तुम्हाला ग्रह दोषांपासून मुक्ती हवी असेल तर गुरुवारी स्नान करून पूजा केल्यानंतर हरभरा डाळ, हळद, पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पितळेची भांडी किंवा सोने इत्यादी गरजूला दान करा.
Mars Transit 2022: मिथुन राशीत मंगळ ग्रह करणार एन्ट्री, 'या' राशींना मिळणार पाठबळ
-गुरुवारी गरिबांना तांदूळ आणि डाळीपासून बनवलेले अन्न वाटप करा. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.
-या दिवशी हळदीचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)