Mars Transit 2022: मिथुन राशीत मंगळ ग्रह करणार एन्ट्री, 'या' राशींना मिळणार पाठबळ

ग्रहांचा राशीबदलामुळे राशीचक्रात अनेक बदल घडत असतात. एकाच राशीच कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर परिणाम होतो. गोचर कुंडलीतील 12 स्थानांवर कुठे कशी दृष्टी यावरून भाकीत केलं जातं.

Updated: Oct 6, 2022, 12:48 PM IST
Mars Transit 2022: मिथुन राशीत मंगळ ग्रह करणार एन्ट्री, 'या' राशींना मिळणार पाठबळ title=

Mangal Rashi Parivartan 2022: ग्रहांचा गोचराकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. कारण ग्रहांचा राशीबदलामुळे राशीचक्रात अनेक बदल घडत असतात. एकाच राशीच कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर परिणाम होतो. गोचर कुंडलीतील 12 स्थानांवर कुठे कशी दृष्टी यावरून भाकीत केलं जातं. ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. 16 ऑक्टोबरला मंगळ ग्रह राशी बदल करत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींना फटका, तर काही राशींना पाठबळ मिळणार आहे. 

कर्क- मंगळ गोचरामुळे वयोवृद्ध व्यक्तीकडून धनलाभ होऊ शकतो. कुटुंबासह धार्मिक प्रवासाचे नियोजन होईल. कुटुंबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जिथे काम करत असाल तिथे अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. 

कन्या- मंगळाचा राशी बदल व्यावसायिकांसाठी शुभ ठरणार आहेत. व्यवसायात विस्ताराची योजना आखत असाल तर यश मिळेल. घरात शुभ कार्य होतील. तुम्ही नोकरीत बदल शोधत असाल तर ही वेळ योग्य आहे. आईची साथ मिळेल. वाहन सुख मिळेल.

तूळ- ऑक्टोबरमध्ये मंगळाच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांचे नशीबही उजळेल. पैसाही मिळेल आणि बचतही वाढेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वाहन सुख वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

Dusara 2022: रावणाने शनिदेवांना ठेवलं होतं पायाखाली! जाणून घ्या या मागची पौराणिक कथा

वृश्चिक- मंगळाच्या राशीत बदलामुळे आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आईचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पैसे मिळण्याची शक्यता आहे.

मकर- नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. मालमत्तेतून उत्पन्न वाढेल. एखाद्या कार्यक्रमाला जावे लागेल. या काळात प्रगतीचे नवे मार्ग मिळतील. उत्पन्न वाढेल. आईचे सहकार्य मिळेल.

कुंभ- मन प्रसन्न राहील. मात्र, आत्मसंयम ठेवा. रागावणे टाळा, अन्यथा तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नती होऊ शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)