Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला भावासोबत वहिनीच्या मनगटावर का बांधावी राखी? काय आहे Lumba Rakhi?
Raksha Bandhan Shubh Muhurt : गेल्या काही वर्षांमध्ये भावासोबत वहिनींनाही राखी बांधण्याचा ट्रेंड आला आहे. त्यासाठी बाजारात Lumba Rakhi पाहिला मिळते. काय आहे ही प्रथा जाणून घ्या.
Raksha Bandhan Shubh Muhurt : रक्षाबंधनाचा सण हा खरं तर नातं मजबूत करण्याचा एक उत्सव आहे. बहिणी भावाचा पवित्र नात्याचा या सणाला भावासोबत वहिनीच्याही मनगटावर राखी बांधण्याचा ट्रेंड आला आहे. वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे. पौराणिक कथेनुसार गुजरातचा बादशहा बहादुरशहाने चित्तोडराज्यावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पहात होती. तिने त्याच्याशी धैर्याने युद्ध केलं. (Why tie rakhi on sister in law hand with brother on Raksha Bandhan Lumba Rakhi)
पराक्रम गाजवला पण बहादुरशहाच्या सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडली आणि पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायुं याला राखी पाठवून आपलं चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितलं आणि हुमायुंने राखीचा स्वीकार करुन जाती, धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केलं. हे आहे राखीचं सामर्थ्य.
हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे एक खोलवर विचार आणि कल्पना आहे. नात्यामधील ओलावा, प्रेम आणि सुरक्षतेची भावना कायम जिवंत राहावी म्हणून रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यात येतो. या आणि अशा अनेक पौराणिक कथेतून राखीची परंपरेबद्दल सांगण्यात आलंय.
हल्ली बहीण भावाच्या मनगटासोबत भावजयाच्या मनगटावरही राखी बांधतेय. काय आहे ही प्रथा आणि काय आहेमागील उद्देश याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणींच्या घरी का जाऊ नये? जाणून घ्या या मागचे खास कारण
रक्षाबंधनाला भावासोबत वहिनीच्या मनगटावर का बांधावी राखी?
असं मानलं जातं की जेव्हा एखाद्या भावाचं लग्न होतं तेव्हा त्याची पत्नी म्हणजेच वहिनी देखील तिच्या नवऱ्याला प्रत्येक कामात साथ देते. ती त्याची सोबती, जोडीदार असते, जबाबदाऱ्या पार पाडते, त्याला प्रत्येक कामात साथ देण्याचे वचन देते आणि धार्मिक कार्यातही सोबत असते. अशा वेळी वहिनीही आपलं रक्षण करेल या विश्वासाने बहिणी भावाच्या तसंच वहिनीच्या मनगटावरही राखी बांधतात. त्याचबरोबर बहिणींना लुंबा बांधण्याची परंपरा मारवाडी कुटुंबांमध्ये फार पूर्वीपासून चालत आलीय. लुंबा राखी ही वहिनीच्या डाव्या मनगटावर बांधावी.
भावजयाच्या मनगटावर बांधा 'या' रंगाची राखी!
वहिनीच्या मनगटावर भगव्या रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते. असं मानलं जातं की हा रंग सूर्यासाठी जबाबदार आहे. या रंगाची राखी बांधल्याने मां लक्ष्मीची कृपा होते, नशीब वाढते आणि सौभाग्य प्राप्त होतं. त्याशिवाय चमकदार गुलाबी राखी देखील बांधता येते. हा रंग बुध आणि शुक्राचा प्रभाव मानला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)